महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू; आदित्य ठाकरे कडाडले
मुंबईतील कुर्ला येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मिंधे आणि भाजपवर हल्लाबोल केला. मुंबई वाचवण्यासाठी महाराष्ट्रद्वेष्ट्या सरकारला गाडण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेपासून सेफ राहू, असेही त्यांनी सांगितले. मशालीला मतदान करत महाराष्ट्रतील अंधार दूर करा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.
कर्नाटकातील रेवण्णासारखा राक्षस आणि गुजरातमधील बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना स्वतःच्या पक्षात घेतले. त्यांचा सत्कार केला. ते हिंदुत्ववादी कसे असू शकतात. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवण दिली आहे की, महिलेची कोणताही जातपात धर्म असो, तिच्यावर कोणी हात उचलला तर त्याचा जात, धर्म न पाहाता त्याला भरचौकात फाशीच झाली पाहिजे, हे आपले हिंदुत्व असले पाहिजे.
आपले मुख्यमंत्री प्रत्येक सभेत विचारतात, आले पैसे आले, काय करणार, असे त्यांनी किती पैसे दिलेत बहिणींना. त्यांनी अदानीला मुंबई फुकटात दिली आहे. अदानीसारखा राक्षस मुंबई गिळायला बसला आहे. मिंधे, भाजप आपल्या अंगावर येत मुंबई लुटायला बसले आहेत. या मतदारसंघातही मदर डेरीचा 21 एकरचा प्लॉट आहे, तो अदानीला फुकटात दिला आहे. मुंबईत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्यांना कोणालाही अदानीसारखी जमीन फुकट मिळत नाही. मुंबईकरांना एक इंचही जमीन मिळत नाही आणि अदानीला फुकटात जमीन का देण्यात येत आहे, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईसाठी आपल्याला आता लढावेच लागेल. आपल्यासाठी, मुंबईसाठी कोणीही येणार नाही, आपल्यालाच मुंबईसाठी एकत्र यावे लागेल. आमचा वैयक्तीक राग गौतम अदानी यांच्यावर नाही. मात्र, कोणत्याही उद्योगपतीला आम्ही मुंबई लूटू देणार नाही. गरज पडली तर नडू आणि लढू पण मुंबई कोणलाही लुटू देणार नाही. महाविकास आघाडी सरकार बनेल, त्यावेळी धारवी पुनर्विकास प्रकल्पाची निविद रद्दा करण्यात येईल. अदानीला दिलेली जमीन परत मिळवणार आणि धारावीकरांना धारावीतच 500 चौरस फूंटाचे घर देऊ, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पोलीस परिवार आणि पोलीस क्वाटर्ससाठी आपण दिलेला 650 कोटी निधी अर्थसंकल्पात दिले होते. या महायुती सरकारने रोखून ठेवला आहे. आपल्यावर धाडी टाकायला, मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यावर लाठीमार करायाला ते पोलिसांचा वापर करतात. मात्र, पोलिसांच्या घरांचा विचार ते करत नाही. पोलिसांचा विचार आपण करायला हवा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर निवृत्त पोलीसवाल्यांना मुंबईतच हक्काची घरं देण्यात येतील. सर्व्हिस क्वॉटर्सची अवस्था सुधारण्यात येईल. आता जे पोलीस दलात भरती झालेत ते अनेक अडचणींचा सामना करत दाखल झाले आहे. त्यांना बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यावे लागतात. हे गद्दार सरकार प्रत्येक कामासाठी पैसे मागत आहे. प्रत्येक फाईलवर वजन ठेवावे लागते.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –
शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव नाही
शेतकऱ्यांची मुले शेती करण्यास धजावत नाही
रस्ते घोटाळ्यामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे
एकही नवा उद्योग राज्यात आला नाही
राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला नेले आहेत.
भाजप आणि मिंधे यांच्या मनात महाराष्ट्रद्वेष आहे
बुलेटट्रेन नेमकी कोणासाठी होत आहे, त्याचा फायदा कोणाला होणार आहे
देशाचे प्रत्येक राज्य प्रगती करत राहिले तर देशाचीही प्रगती होईल
महाराष्ट्राच्या हक्काचे सर्व गुजरातमध्ये पळवण्यात येत आहे
आमचा गुजरातशी वाद नाही, मात्र आमच्या हक्काचे आम्ही ओरबाडू देणार नाही
सरकारी कमर्चारी, सफाई कर्मचारी,बेस्ट कर्मचारी यांचे पेन्शन, ग्रॅच्युइटीसह मुंबईत घरे देण्यात येणार आहे
जगातील सर्वात परवडणारी सेवा बेस्टची आहे, बेस्ट बसेससाठी इलेक्ट्रिक बसेस 10 हजारपर्यंत वाढवणार होतो
आता महायुती सरकारने बेस्ट बसेसची संख्या कमी केली आहे.
रेल्वेचा मेगाब्लॉक असतो, रस्ते, उड्डाणपूलांची दुरवस्था झाली आहे.
असे घडवण्यात येत असून राज्यात उद्योग येऊच नये,यासाठी प्रयत्न होत आहे.
मुंबईला आर्थिदृष्ट्या संपवण्याचा डाव रचण्यात येत आहे
भाजपच्या निष्ठावंतानाही काही मिळाले नाही, त्यामुळे आता परिवर्तनाची गरज आहे
महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप आणि मिंधेंपासून सेफ राहू
मशालीला मतदान करा आणि महाराष्ट्रतला अंधार दूर करा
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List