आयपीएलपूर्वी अर्जुनचा धुमाकूळ
हिंदुस्थानचा विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये मोठा धुमाकूळ घातलाय. त्याने गोवा संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत कारकिर्दीत प्रथमच 5 बळी टिपत आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी धुमाकूळ घातला आहे.
रणजी ट्रॉफीच्या प्लेट मॅचमध्ये अरुणाचल प्रदेशला पहिल्या दिवशी गोव्याने 84 धावांत गुंडाळले. यामध्ये अर्जुन तेंडुलकरची मोठी भूमिका होती. अर्जुनने नीलम ओबी, नबाम हाचांग, चिन्मय पाटील, जय भावसार आणि मोजी एटे यांना बाद केले. अर्जुन तेंडुलकरला मोहित रेडकर (3/15) आणि कीथ पिंटो (2/31) यांची चांगली साथ लाभली. अरुणाचल प्रदेशचा डाव 30.3 षटकांवर आटोपला. आयपीएल लिलावापूर्वी अर्जुन तेंडुलकरने या कामगिरीच्या बळावर सर्व फ्रँचायझींचे लक्ष आपल्याकडे खेचले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List