इराणमध्ये आरोपीला 6 महिन्यात दोनदा फासावर लटकवले, नेमके काय आहे प्रकरण?

इराणमध्ये आरोपीला 6 महिन्यात दोनदा फासावर लटकवले, नेमके काय आहे प्रकरण?

इराण जगातल्या सर्वात कट्टर इस्लामिक देशांच्या लिस्टमध्ये आहे. जिथे फाशीची शिक्षा देणे सर्वसामान्य गोष्ट आहे. आता याच फाशीशी संबंधित एक अनोखे प्रकरण समोर आले आहे.

इराण हा जगातल्या त्या देशांपैकी एक देश आहे जिथे सगळ्यात जास्त फाशीची शिक्षा दिली जाते. आता इराण येथून अनोखे प्रकरण समोर आले आहे. नार्वे येथील इराण मानवाधिकार संघटनेच्या (आयएचआर) अहवालानुसार, एका इराणी व्यक्तीला 6 महिन्यांच्या आत दोनदा फासावर चढविण्यात आले आहे. एनजीओनुसार अहमद अलीजादेह असे त्या व्यक्तीचे नाव असून 2018 मध्ये त्याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यानंतर त्याला मृत्यूची शिक्षा ठोठावण्यात आली.

अहमदने हे आरोप फेटाळले होते. दरम्यान त्यानंतरही त्याला यावर्षी 27 एप्रिल रोजी तेहरानच्या बाहेर करजस्थित गेजेल हेसल तुरुंगात फासावर चढविण्यात आले होते. तो फासावर चढल्यानंतर त्याला 28 सेकंदांनी खाली उतरविण्यात आले. आयएचआरने सांगितले की, पिडीत मुलाच्या कुटुंबियांना फाशी दरम्यान अचानक माफ करा सांगितले होते.त्यानंतर फाशीची शिक्षा रोखण्यात आली होती.

इराणच्या शरिया कायद्यानुसार, पीडिताचे कुटुंब अपराध्याला माफ करु शकतं किंवा जीव वाचविण्याच्या मोबदल्यात पैशांची मागणी करु शकतात. दरम्यान, मागच्या 13 नोव्हेंबर रोजी सकाळी अहमद अलीजादेह याला पुन्हा फासावर चढविण्यात आले. आयएचआरने या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले एक प्रतिभाशाली विद्यार्थ्याला हत्येच्या आरोपाखाली दुसऱ्यांदा फाशीची शिक्षा दिली, ज्यासाठी त्याला जाणुनबुजुन त्रास देण्यात आला. इराणच्या इस्लामी शासनाच्याविरोधाला दाबण्यासाठी मृत्यूच्या शिक्षेला भितीच्या रुपाने वापरण्यात आले आहे. 2024 मध्ये मृत्यूदंडाच्या शिक्षेत वाढ दिसली आहे. इराणने ऑक्टोबरमध्ये कमीत कमी 166 लोकांना फाशीची शिक्षा दिली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा… निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी मेट्रो वनच्या वेळेत वाढ, पहिली आणि शेवटची फेरी कधी सुटणार पाहा…
मुंबईसह महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका येत्या 20 नोव्हेंबर रोजी आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी...
‘यावेळी मी स्वतःच नंदेकडे दिवाळीच्या फराळाचा डबा घेऊन गेले कारण..’, महागाईवरून सुप्रिया सुळेंचा सरकारला खोचक टोला
अक्षय कुमारचा 2025 मध्ये धुमाकूळच; 7 चित्रपट लागोपाट येणार; हॉरर, कॉमेडीसंग अॅक्शनचा तडका!
घरातील मोठी माणसं तुम्हाला अन्न चावून खाण्याच्या सल्ला देतात, जाणून घ्या त्याचे ५ जबरदस्त फायदे
मधुमेहाच्या रुग्णांनी न्याहारीमध्ये करावा ‘या’ ४ गोष्टींचा समावेश, शुगर लेव्हल राहील नियंत्रित
हिवाळ्यात ‘या’ 5 खाण्यापिण्याच्या सवयी टाळा, निरोगी आयुष्य जगा
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर करा या पदार्थांचे सेवन, दहा दिवसात वाढेल रक्त