झारखंडमध्ये 65 टक्के मतदान, 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 जिह्यांतील 43 जागांसाठी आज 64.86 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात एकूण 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उर्वरित 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
पहिल्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, त्यांचा मुलगा बाबूलाल सोरेन, माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी मीरा मुंडा, मधु कोडा यांच्या पत्नी गीता कोडा निवडणूक रिंगणात आहेत.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नक्षलग्रस्त तमाडच्या अरहंगा येथे मतदान पेंद्र उभारण्यात आले होते. तिथे मतदान शांततेत पार पडले. दरम्यान, गुमलाचे पोलीस निरीक्षक किशन सहाय मीणा यांना न सांगता डय़ुटीवरून गायब झाल्याने निलंबित करण्यात आले.
वायनाडमध्ये 60 टक्के मतदान
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले. काँग्रेसच्या उमेदवार प्रियंका गांधी यांनी अनेक ठिकाणी बुथवर जाऊन लोकांशी संवाद साधला. वायनाडमध्ये 60.79 टक्के मतदान झाले. 10 राज्यांत विधानसभेच्या 31 जागांसाठीही मतदान झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List