20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, राज्य सरकारचे परिपत्रक जारी
राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानेही यापूर्वी विधानसभा निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येत असल्याचं सांगितलं होतं. राज्यातील कामगार आयुक्तांना तसे निर्देशही दिले होते. आता, राज्य सरकारकडून परिपरत्रक जारी करण्यात आले असून 20 नोव्हेंबर रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान दिनी 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर झाली आहे. त्यानुसार, क्रमांक सार्वसु-१०२४/१२६ (२९) लेखअधिनियम, १८८९ (१८८९चा २६) च्या कलम २५ नुसार भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३१/१/६८ जेयुडीएल तीन दिनांक ८ मे १९६८ अन्यये महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघानिक सुट्टी करीत आहे, असे परिपत्रकच राज्य शासनाच्यावतीने करण्यात आला आहे.
मंत्रालयातील सर्व विभागांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सदरची अधिसूचना त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणावी. तसेच केंद्र शासनाधीन शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्याचे सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादींना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभाग यांनी सदर अधिसूचना काढून प्रसिद्ध करावी, असे आदेशही महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी दिले आहेत. शासनाचे उपसचिव दिलीप देशपांडे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List