पिके वाढली की रोगही वाढतात! इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संधीसाधूंवर नितीन गडकरी यांचा निशाणा
भाजपचा विस्तार झपाटय़ाने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही वाढतात. भाजपकडे भरपूर पीक आहे, जे चांगले उत्पादन देतात, परंतु काही रोगदेखील आणतात. त्यामुळे अशा आजारी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करावी लागते, अशी टीका पेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बंडखोर नेते, कार्यकर्त्यांवर केली. नागपूरमध्ये एका मुलाखतीत बोलताना पेंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बंडखोरांवर खरमरीत टीका केली. बंडखोरांच्या सततच्या आक्षेपार्ह वाचाळपणाबद्दलही गडकरी उघडपणे बोलले. ते म्हणाले, भाजपमध्ये नवीन लोक वेगवेगळ्या कारणांसाठी येत आहेत. त्यांना प्रशिक्षण देणे, विचारधारा सांगणे आणि त्यांना कार्यकर्ता बनवणे ही आपली जबाबदारी आहे. हजार कामगार उभे असतात, पण कधी कधी एक कामगार काहीतरी बोलतो आणि त्या हजार कामगारांच्या मेहनतीवर पाणी फेरतो.
सरकार, प्रशासन धर्मनिरपेक्ष असावे
एखादी व्यक्ती धर्मनिरपेक्ष असो वा नसो, पण राज्य, सरकार आणि प्रशासन हे धर्मनिरपेक्ष असले पाहिजे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या भाजपच्या बैठकाRमध्येही त्यांना डावलले जात असल्याबद्दल विचारले असता राज्यातील भाजप नेते राज्यकारभार करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे भाजप अध्यक्ष नड्डा आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, घेतलेल्या बैठकीत उपस्थित राहिलो नसल्याचे त्यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List