हातात मशाल घेतलेली जनता रावणाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही; उद्धव ठाकरे यांचा विश्वास
बार्शी येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख यांची सभा झाली. या सभेसाठी मोठा जनसागर उसळला होता. त्यावेळी मोबाईलचे टॉर्च सुरू करत उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात या मोबाईल टॉर्चचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, जनतेने लावलेल्या मोबाईल टॉर्चमुळे गर्दी कुठपर्यंत गेली आहे हे समजते. हे मोबाईल टॉर्च नसून या धगधगत्या मशाली आहेत. या मशाली गद्दार आणि भ्रष्ट महायुतीच्या कारभाराला जाळून टाकणार आहेत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकसभेला जनतेने त्यांना दणका दिला म्हणून त्यांनी फेक नरेटिव्ह अशी ओरड करायला सुरुवात केली. मात्र, आता महाराष्ट्राच्या हक्काचे इतर राज्यात जात आहे की नाही. महाराष्ट्रातील रोजगार इतर राज्यात जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात आहेत, हे फेक नरेटिव्ह आहे की फॅक्ट आहे, असा रोखठोक सवालही उद्धव ठाकरे यांनी भाजपला करत त्यांची बोलती बंद केली.
झेंडा फडकतो तशी माणसेही इकडून तिकडे फडफडतात. इथे बार्शीत गद्दारी करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आपले कैलास पाटील सोन्याच्या लंकेपर्यत जाऊन परत आलेत. आपल्याकडून पक्ष, चिन्ह सर्व चोरले तरीही ते अर्ध्या वाटेतून परत आले. याला धाडस लागते. त्यांना माहिती होते, समोर लंका दिसत असली तरी ती रावणाची लंका आहे. आता मशाल हातात घेतलेली जनता ही लंका पेटवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
गद्दार विकले जातात, मात्र, निष्ठा आणि निष्ठावान विकले जात नाही. जेव्हा त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते, तेव्हा त्यांना आपण खांद्यावर घेतले. मात्र, त्यांचे हिंदुत्व फसवे निघाले. अनेक ठिकाणी आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. त्यांनी पक्ष, चिन्ह, नाव सर्व चोरले आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव लावायला त्यांना भीती वाटते. मात्र, ही जमलेली जनता ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे.
त्यांनी काल, परवा माझी बॅक तपासली. त्यांना मी विचारले माझ्याआधी कोणाची बॅग तपासली, याआधी कोणाची तपासली, त्यांनी माझ्यापासूनच तपासणीला सुरुवात केली. तसेच औसापासून हेलिकॉप्टर उड्डाणाची परवानगी दिली नाही, कारण की मोदी यांची सभा होती. त्यामुळे माझ्या हेलिकॉप्टरचे उड्डाणाला विलंब करण्यात आला. देशाच्या पंतप्रधानाने कोणत्याही एका पक्षाचा प्रचार करता कामा नये. जो कायदा आम्हाला आहे, तो त्यांनाही लागू असला पाहिजे.
राज्यात एकच चित्र आहे. शेतकरी हतबल आहे. सोयबीन कापूस ,डाळी यांना भाव नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. जनता महागाईत होरपळते आहे. या मुखअय समस्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी कलम 370 हटवणे, राम मंदिर असे विषय ते काढत आहे. लोकशाही निवडणुकीत आपण हुकूमशाहीविरोधात लढत होतो. आजही लढतोय आणि उद्याही लढणार, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातले उद्योग गुजराततेत जात आहे, हे फेक नरेटिव्ह आहे की फॅक्ट आहे, असा रोखठोक सवालही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्यासाठी 400 पारच्या घोषणा ते करत होते. जनतेने फटका दिल्यानंतर हे फेक नरेटिव्ह असल्याने जनता फसली असे ते सांगतात. मात्र, राज्यातले सर्व गुजरातेत जात आहे, हे सत्य सर्वांना दिसत आहे. गुजरात आणि महाराष्ट्र अशी भिंत ते उभारत आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या भिंती पाडणार कोण, त्यांनी उभारलेल्या या भिंती पाडण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आपल्या उमेदवारांविरोधात खोटा प्रचार करण्यात येत आहे
देवेंद्र फडणवीस धर्मयुद्ध शब्द वपारतात, ते निवडणूक आयोगाला चालते का
आमच्याकडे असला की देशद्राही, दाऊदशी संबंध आणि त्यांच्याकडे गेले की पवित्र
महाराष्ट्र कधीही कोणाचा गुलाम बनून राहणार नाही
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा, असे सेनापती बापट सांगत होते, असेही ते म्हणाले
आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली होती
आपण सोयाबीन, कापूस, दूध, शेतमालाला भाव दिला होता
आता जीएसटीमुळे जनता महागाईत होरपळथ आहेत
सकाळपासून रात्रीपर्यंत वापारण्यात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंवर, साहित्यांवर, कृषी अवजारांवरही जीएसटी आहे
आता जी एसटी येईल, त्यात हे सरकार बसवा आणि त्यांना गुवाहाटीला पाठवा
गद्दारांनी गुवाहाटीतले डोंगर पाहिले आता त्यांना रायगडावरील टकमक टोक दाखवायचे आहे
आपले सरकार आल्यावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार
मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार
प्रत्येक महिलेला 3 हजार रुपये देणार
शेतकी आत्महत्येमुळे त्यांच्या मुलांनी शिक्षण सोडले आहे
शिक्षणाअभावी नोकरी नाही, नोकरी नाही, त्यामुळे लग्नही होत नाही, अशी स्थिती आहे
पैशांअभावी इच्छा असूनही अनेक मुलांना शिकता येत नाही
राज्यात शिक्षणाचा पत्ता नाही आणि राज्यातील उद्योग गुजरातला पाटवण्यात येत आहे
महाराष्ट्र कोणासमोरही हात पसरणार नाही, आम्हांला आमच्या हक्काचे द्या
जनतेचा लुटलेला पैसाच बहिणींना 1500 रुपये देण्यात येत आहेत.
1500 रुपये देत ते महिलांना धमकी देत आहेत.
धमकी देणाऱ्यांना स्पष्ट इशारा आहे, महिलांच्या केसालाही धक्का लागला तर हात जागेवर ठेवणार नाही
महाराष्ट्राचे संस्कार शिकवण पुसून टाकायला निघाले आहेत
सिंधुदुर्ग येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाजारांचा पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने पुतळा कोसळला.
हा राज्याच्या वर्मी लागलेला हा घाव आहे, त्यांना आता धडा शिकवावा लागणार आहे
गरीब मुळासकट उखडला जातोय आणि मोदी मस्तीत फिरत आहेत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे उभारण्यात येणार आहेत
सुरत आणि गुवाहाटीलाही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र हेच माझे कुटुंब आहे, कुटुंबप्रमुख म्हणून जनता माझ्यामागे उभी आहे
जनता हीच माझी संपत्ती आहे, हे भाड्याने आलेले लोकं नाहीत, आपलेपणाने ते आले आहेत.
महाराष्ट्र विकला जाणार नाही, यासाठी सावध राहा
महाराष्ट्र लुटेंग और दोस्तों मे बाटेंगे हा भाजपचा डाव यशस्वी होऊ देऊ नका
महाराष्ट्र तुटणार नाही, झुकणार नाही, विकला जाणार नाही अशी प्रतिज्ञा करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List