मोहम्मद शमी आला रे! हिंदुस्थानला दिलासा, बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता
‘टीम इंडिया’चा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावसकर क्रिकेट ट्रॉफीत खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बंगाल संघाचा हा प्रमुख गोलंदाज दुखापतीतून सावरला असून, रणजी करंडक स्पर्धेत तो इंदूरमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध होणाऱ्या लढतीत खेळणार आहे.
‘बीसीसीआय’ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ आधीच जाहीर केला आहे; मात्र तंदुरुस्त नसल्यामुळे मोहम्मद शमीला संघात स्थान मिळालेले नाही. आता हिंदुस्थानचा हा स्टार गोलंदाज रणजी सामन्यातून आपली तंदुरुस्ती दाखवून पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणजी ट्रॉफीत जर शमीने चांगली कामगिरी केली, तर कदाचित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियातील दुसरा सामना 6 डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
पाकिस्तानची ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’तून माघारीची शक्यता; यूएई आणि दक्षिण आफ्रिका आयोजनाच्या तयारीत
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List