भाजपच्या जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना बजावले

भाजपच्या जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना बजावले

कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना बजावले.

या घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले आहेत. 27 नोव्हेंबर 2024 रोजी यावर पुढील सुनावणी होणार आहे.

साताऱयातील मायणी येथील कोरोना उपचार केंद्रातील घोटाळ्याच्या सखोल चौकशीसाठी दीपक देशमुख यांनी अॅड. वैभव गायकवाड यांच्यामार्फत याचिका केली आहे. या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गोरे यांच्यासह अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास योग्य प्रकारे सुरू असल्याची माहिती सातारा पोलिसांकडून न्यायालयाला देण्यात आली.

तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का?

मंगळवारच्या सुनावणीला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख हे व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे हजर होते. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का, अशी विचारणा न्यायालयाने पोलीस अधीक्षक शेख यांना केली. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. दीपक देशमुख यांनी केलेल्या आरोपांची सविस्तर चौकशी सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक शेख यांनी न्यायालयात स्पष्ट केले.

मृतांच्या नावे पैसे लाटले

मायणी येथील मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटरचे जयकुमार गोरे अध्यक्ष असून दीपक देशमुख हे उपाध्यक्ष आहेत. येथे कोरोना उपचार पेंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. कोरोनाने मृत झालेल्यांच्या नावे पैसे लाटण्यात आले, असा आरोप देशमुख यांनी याचिकेत केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी...
सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
“या दलदलीत मला पडायचं नाही..”; सूरजसोबतच्या वादावर अंकिताने स्पष्ट केली तिची बाजू
अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे ‘तो’?
“माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बोलणार की शक्तीमान..”; रणवीर सिंहवर का भडकले मुकेश खन्ना?
‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाला मिळालं इतकं मानधन; समंथापेक्षा 60% कमी फी
भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार