दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये प्रवाशाला सर्पदंश, उपचारानंतर प्रवाशाची प्रकृती स्थिर
दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाला सर्पदंश झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अन्य प्रवाशांनी तात्काळ आरपीएफला माहिती दिली. आरपीएफने प्रवाशाला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. ट्रेनमध्ये तपासणी केली असता साप आढळला नाही.
मध्य प्रदेशातील टिकमगढचा रहिवासी असलेला भगवानदास दादर-अमृतसर एक्सप्रेसने दिल्लीला चालला होता. भगवानदास जनरल कोचने प्रवास करत होता. डब्यात गर्दी खूप असल्याने तो ट्रेनच्या दाराजवळ उभा होता.
ट्रेन डबरा आणि ग्वाल्हेर दरम्यान येताच भगवानदास अचानक ओरडू लागला. आरडाओरडा ऐकून अन्य प्रवाशांनी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने आपल्याला साप चावल्याचे सांगितले. यानंतर प्रवाशांनी रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून याबाबत कळवले.
माहिती मिळताच आरपीएफने भगवानदासला ग्वाल्हेर स्थानकावर उतरवले. मग त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, रेल्वे कोचमध्ये तपासणी केली असता कुठेही साप आढळला नाही, तसेच प्रवाशांनीही साप पाहिला नसल्याचे झांसीचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज कुमार यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List