तयारी मतदानाची! पालिकेचे 50 हजार कर्मचारी, अधिकारी निवडणूक डय़ुटीवर; दैनंदिन कामावरही होणार परिणाम
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पुढील आठवडय़ात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. मतदानासाठी अवघे 8 दिवस उरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी मतदान केंद्र उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबईतील सायन-कोळीवाडा येथील सरदार नगर शाळेतील मतदान केंद्र सज्ज करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्या खांद्याकर जिल्हा मुख्य निकडणूक अधिकारी पदाची जबाबदारी सोपवली असताना पालिकेच्या 50 हजारांवर कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटी लावण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या बहुतांशी वॉर्ड ऑफिसमध्ये शुकशुकाट दिसत असून नागरिकांची कामे खोळंबली असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र निवडणूक डय़ुटी अनिवार्य असल्याने पालिकेकडेही निवडणूक निकाल लागेपर्यंत पर्याय नसल्याचे समोर आले आहे.
मुंबई महानगरपालिकेचे सुमारे एक लाख कर्मचारी-अधिकारी आहेत. यातील तब्बल 50 हजारांवर कर्मचाऱयांना निवडणूक डय़ुटी लागली आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी मुंबई महापालिकेतील सुमारे 52 हजार कामगार, कर्मचारी, अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 10 हजार कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या पदाकर निकडणूकीचे कामकाज करत आहेत. या सर्क कामगार, कर्मचारी, अधिकाऱयांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामकाजाकरिता विविध जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मतदान पाडल्यानंतर दुसऱया दिवशी, 21 नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत तेथे थांबावे लागणार आहे. त्यांना 21 तारखेला पालिकेच्या कामासाठी बोलवण्यात येऊ नये, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे.
निवडणुकीतही संबंधित कामगार, कर्मचारी, अधिकाऱयांना या कामकाजासाठी लागणारे निकडणूक साहित्य व मतदान यंत्रे ताब्यात घेण्याकरिता 19 तारखेला सकाळी 8 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात उपस्थित रहावे लागणार आहे. हे साहित्य घेऊन नेमून दिलेल्या मतदान केंद्रात जाऊन तेथे मतदान केंद्राची उभारणी, आवश्यक ते नियोजन करावे लागणार आहे. त्या दिवशी तेथेच मुक्काम करुन 20 तारखेला पहाटे 5 वाजता प्रत्यक्ष निवडणुकीच्या कर्तव्यासाठी उपस्थित रहावे लागणार आहे.
20 तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे व मतदान यंत्रे जमा करेपर्यंत संबंधितांना नेमून दिलेले ठिकाण सोडता येणार नाही. हे सर्व कामकाज पार पाडण्याकरीता 21 तारखेच्या सकाळपर्यंत थांबावे लागणार आहे. म्हणजेच सुमारे 40 ते 45 तास सलग कामकाज करावे लागणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List