झारखंडमध्ये मतदानापूर्वी गोळीबार, सीआरपीएफ जवान जखमी
झारखंडमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. मात्र मतदान सुरू होण्यापूर्वीच पलामूमध्ये हिंसक घटना घडली आहे. मतदानाच्या ठिकाणी ड्युटीवर तैनात सीआरपीएफ जवानावर गोळी झाडण्यात आली. यात जवानाच्या डोक्याला गोळी लागली. संतोष कुमार यादव असे जखमी जवानाचे नाव आहे. जखमी जवानाला उपचारासाठी सुरवातीला मेदिनीराई मेडिकल कॉलेज मग रांचीला पाठवण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष कुमार हे विधानसभा निवडणुकीच्या सुरक्षेसाठी लातेहारच्या लभर येथे तैनात होते. या दरम्यान आज सकाळी अचानक गोळीबार झाला आणि यात संतोष कुमारजखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पलामूचे एसपी रिश्मा रामसन, सीआरपीएफचे डीआयजी पंकज कुमार आणि सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले.
दरम्यान, गोळीबार कुणी आणि कोणत्या कारणातून केला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List