रत्नागिरीत हातखंबा नाक्यावर 35 लाखांचे सोने पकडले; ‘एसएसटी’ पथकाची कारवाई
मुंबईवरुन रत्नागिरीकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता 34 लाख 85 हजार 947 रुपयांचे सोने विना पावती मिळून आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली. इको हे वाहन मंगळवारी मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते.
रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या एसएसटी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात 34 लाख 85 हजार 947 रुपयांचे सोने आढळले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एसएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदार संघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List