आमदार फोडा, सरकार पाडा हे संविधानात लिहिले आहे का? राहुल गांधींचा मोदींना सवाल
आमदार फोडा, सरकार पाडा, असं संविधानात लिहिलं आहे का, असा खणखणीत सवाल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज गोंदिया येथील जाहीर सभेत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला.
पंतप्रधान मोदींनी संविधान वाचले असते तर त्यात लिहिलेल्या गोष्टींचा त्यांनी आदर केला असता, असा टोला हाणतानाच महाराष्ट्रात पैसे देऊन आमदार खरेदी केले गेले आणि सरकार चोरलं गेलं तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान कमकुवत झालं, असे राहुल म्हणाले.
द्वेषाला प्रेमाने हरवण्याची ही लढाई आहे. संविधान हे प्रेमाचे पुस्तक आहे. संविधानात द्वेष सापडत नाही पण भाजपच्या लोकांच्या मनात मात्र द्वेष ठासून भरलेला आहे, असा निशाणाही राहुल यांनी साधला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List