सामना अग्रलेख – बनवाबनवी!

सामना अग्रलेख – बनवाबनवी!

370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावीत, पण मोदी हे भलतेच विषय घेऊन बोलत आहेत. यालाच बनवाबनवी म्हणतात!

पंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारी लवाजम्यासह सध्या महाराष्ट्रातील प्रचार कार्यात गुंतले आहेत. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने एक तर प्रचारात फार अडकू नये. पंतप्रधान हे एखाद्या पक्षाचे नसतात. विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा निवडणुकांच्या प्रचारातही अलीकडे आपले पंतप्रधान वारंवार दिसत आहेत. त्यामुळे पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, नरसिंह राव यांच्यासारख्या नेत्यांनी पंतप्रधान पदास जी उंची गाठून दिली ती खाली आली. पुन्हा पंतप्रधानांनी अशा प्र्रचार सभेत करावयाच्या भाषणांबाबतही काही संकेत आहेत. पंतप्रधानांनी संयमाने बोलावे अशी परंपरा आहे, पण भाजपचे पंतप्रधान मोदी यांनी सर्व संकेत, पदाची प्रतिष्ठा खालच्या पातळीवर आणली. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, ‘देशद्रोही’ वगैरे विषय राज्याच्या निवडणुकीत त्यांनी आणले आहेत. ‘काही देशद्रोही घटक त्यांच्या स्वार्थापोटी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांनी त्यांचा पराभव करावा’, असे श्री. मोदी यांनी जाहीरपणे सांगितले. महाराष्ट्रातील सभेतून ते अशी मुक्ताफळे उधळतात तेव्हा आश्चर्य वाटते. अधूनमधून ते हिंदुत्वाची पुडी सोडतात. लवकरच ट्रम्प, युक्रेन युद्धाचाही प्रवेश त्यांच्या प्रचारसभेत होईल. कश्मीर, 370 कलम याबाबत काँग्रेसकडून कसा विरोध झाला याबाबत पंतप्रधानांची भाषणे सुरू आहेत. चिमूरच्या सभेत

गर्दीतला भगवा

रंग पाहून त्यांनी ‘भगवी गर्दी’ असे जाहीर केले. महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे ‘धर्मयुद्ध’ असल्याचे वक्तव्य भाजपच्या काही लोकांनी केले व पंतप्रधान मोदीही निवडणुकीची धर्मध्वजा घेऊनच प्रचारात उतरले आहेत. मोदी हे भान सुटल्याप्रमाणे बोलतात व त्यांचे भक्त टाळ्या वाजवून फेकुगिरीस प्र्रोत्साहन देतात असे चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार, देशद्राsह वगैरेंचा मुद्दा पंतप्रधानांनी आणला, पण मोदी यांनी हे भ्रष्टाचारी व देशद्रोही कोण याबाबत खुलासा का करू नये? इतर पक्षांतले सर्व भ्रष्टाचारी ईडी, सीबीआयचे आरोपी, मनी लाँडरिंगवाले हे भाजपात सामील झाले आहेत. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिमबरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना श्री. मोदी व त्यांच्या महान पक्षाने आपल्या पंखाखाली घेतले आहे. संविधान, कायदा, न्यायालये आपल्या स्वार्थासाठी हवी तशी मोडून ठेवली. देश एखाद्या व्यापाऱयासारखा चालवून मोदी यांनी सर्व सार्वजनिक संपत्ती आपल्या एकाच उद्योगपती मित्राच्या हवाली केली. हे काय देशभक्तीचे लक्षण झाले? ‘बटेंगे तो कटेंगे’ अशा गर्जना करणे सत्ताधारी पक्ष व त्यांच्या नेत्यांना शोभत नाही. आपण एकाच राज्याचे व एकाच धर्माचे पंतप्रधान आहोत अशा आवेशात मोदी वागत असतील तर ते बरे नाही. महाराष्ट्रासारखे एकेकाळचे बलवान राज्य त्यांनी कमजोर करून ठेवले व पिचक्या पाठकण्याचे लोक त्यासाठी सत्तेवर आणले. हा

एक प्रकारे महाराष्ट्रद्रोहच

आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्यावर मोदी यांचा भर आहे व त्यासाठीच ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ची घोषणा ते देतात. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने संयम व भान गमावले की त्यांचा मोदी होतो व अशा मोदींना पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरसिंह राव, राजीव गांधी, मनमोहन सिंग यांच्याविषयी असुया निर्माण होते. निवडणूक प्रचारातील मनमोहन सिंग यांच्या भाषणांचा अभ्यास मोदी यांनी केला पाहिजे. पंडित नेहरू वगैरे तर त्यांच्या कल्पनेपलीकडचे आहेत. मोदी ज्या पद्धतीने निवडणूक प्रचारात भाषणे ठोकत असतात त्यावरून खऱ्याची दुनिया राहिलेली नाही हे पटायला लागले आहे. समाजाचे विभाजन करण्याची भाषा पंतप्रधानांकडून होत असेल तर भारताचा निवडणूक आयोग चिरुट फुंकत धुराची वलये सोडीत बसला आहे काय? 370 कलमाचा विषय महाराष्ट्राच्या व झारखंडच्या निवडणुकीत आणायचे कारण नाही. 370 कलम हा आता त्या राज्याचा विषय आहे. शिवसेनेने तर 370 कलम हटवताना संसदेत विरोध केला नाही. तरीही मोदी महाराष्ट्रात 370 कलमाचा बुलबुलतरंग वाजवीत आहेत. कारण त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत. महाराष्ट्रात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला तो मोदींच्या धोरणांमुळे. महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग गुजरातला पळवून मोदी यांनी मराठी तरुणांच्या पोटावर लाथ मारली. 370 कलम, ‘बटेंगे, कटेंगे’पेक्षा आमचे उद्योग गुजरातला का पळवले? आमच्या पोरांना बेरोजगार का ठेवले? या प्रश्नांची उत्तरे मोदी यांनी महाराष्ट्राला द्यावीत, पण मोदी हे भलतेच विषय घेऊन बोलत आहेत. यालाच बनवाबनवी म्हणतात!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला महाविकास आघाडीत CM कोण होणार? उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, थेट पक्का फॉर्म्युलाच सांगीतला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रत्येक दिवशी नवनवीन मुद्दे समोर येतात. त्यात एक मुद्दा जास्त चर्चिला गेला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी...
सूरज चव्हाणच्या आयुष्यातील खरा ‘बिग बॉस’ कोण?; अंकिताच्या व्हीडिओनंतर चाहत्यांना प्रश्न
“या दलदलीत मला पडायचं नाही..”; सूरजसोबतच्या वादावर अंकिताने स्पष्ट केली तिची बाजू
अमिषा पटेल 49 व्या वर्षी श्रीमंत उद्योजकाच्या मिठीत, फोटो तुफान व्हायरल, कोण आहे ‘तो’?
“माझ्याच ऑफिसमध्ये येऊन बोलणार की शक्तीमान..”; रणवीर सिंहवर का भडकले मुकेश खन्ना?
‘पुष्पा 2’मधील आयटम साँगसाठी श्रीलीलाला मिळालं इतकं मानधन; समंथापेक्षा 60% कमी फी
भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार