कारवाईची भीती दाखवून महिला उपअभियंत्याकडून पैसे उकळले
मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात कारवाईची भीती दाखवून महिला उपअभियंत्याकडून 3 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार या वांद्रे येथील एका सरकारी आस्थापनात उप अभियंता म्हणून काम करतात. गेल्या आठवडय़ात त्या कार्यालयात असताना त्यांना एका नंबरवरून फोन आला. पह्न करणाऱयाने त्याचे नाव सांगितले. तो टेलिकॉम ऑथॉरिटीमधून बोलत असल्याचे भासवले. त्याने मोबाईल नंबर बंद होणार असल्याचे सांगितले. त्याने ते आधारकार्डवरून सिम कार्ड खरेदी केल्याचे महिलेला सांगितले. तसेच महिलेला तिचा आधारकार्डचा नंबर सांगून त्या नंबरवरून अश्लील मेसेज पोस्ट होत असल्याचे भासवले. पह्न सायबर विभागात ट्रान्स्फर करतो, असे तिला सांगितले.
तेव्हा महिलेने तो नंबर आपला नसल्याचे त्याला स्पष्ट केले. काही वेळाने ठगाने महिलेला व्हॉटसअपवर मेसेज पाठवला. कॉलवर बोलू विषय गंभीर असल्याचे सांगून व्हिडीओ कॉल केला.
तो रेकॉर्डेड व्हिडीओ कॉल होता. काही वेळाने त्याना एका नंबरवरून मेसेज आला. मेसेज करणाऱयाने तो सायबर विभागातील असल्याचे सांगून त्याचा बॅच क्रमांक सांगितला. त्यानंतर ठगाने महिलेला एकांतात जाण्यास सांगितले. पह्नवर बोलणाऱयाने त्याची ओळख सांगितली. एका महिलेच्या नावाने 300 कोटींचा मनी लॉण्डरिंगचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्या खात्यात 26 लाख रुपये गेल्याचे ठगाने महिलेला सांगितले. तेव्हा महिलेने आपली केस वेगळी असल्याचे त्याला स्पष्ट केले.
बनावट लिंकने फसवणूक
ठगाने महिलेला मुंबई पोलिसांच्या नावाची बनावट लिंक पाठवली. त्या लिंकमध्ये आधारकार्डचा नंबर लिहिण्यास सांगितला. त्या लिंकमध्ये महिलेचा पह्टो आरोपी म्हणून होता. ठगाने कारवाईची भीती दाखवून बँक खात्याचा तपशील घेतला. बँक खाते व्हेरिफाय करण्याच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात केली. भीतीपोटी महिलेने तीन लाख रुपये ट्रान्स्फर केले. रात्री महिला घरी गेली. तिने याची माहिती तिच्या पतीला दिली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List