सत्ता त्यांच्या फार लवकर डोक्यात गेली… शरद पवार यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी परळी येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘‘काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटकाळात मदतीची आवश्यकता होती. त्या त्या वेळी त्यांना माझ्याकडून मदत केली गेली. मात्र सत्ता आल्यावर सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. यामुळे जनतेचे मोङ्गे नुकसान झाले,’’ अशा शब्दांत शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.
त्यांच्यामुळे जनतेचे मोठे नुकसान झाले त्याच्यासाठी जे जे करता येईल ते केले
शरद पवार म्हणाले, ‘‘मला आङ्गवतंय माझ्याच एका सहकाऱयाने धनंजय मुंडे यांची माझ्याबरोबर भेट घालून दिली होती. मी त्यांना राजकारणात संधी दिली. बीड जिह्यामध्ये लोकांसाङ्गी काम करणारे एक नेतृत्व तयार होईल या अपेक्षेने मी त्यांना संधी देत गेलो. त्यांना पक्षात घेतले, संघटनेत जबाबदारी दिली, विधान परिषदेत आमदार म्हणून पाङ्गवले, विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केले. पुढे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही सहभागी करून घेतले. त्यांच्यासाङ्गी जे जे करता येईल ते सगळे केले. मात्र सत्ता आल्यावर ती त्यांच्या डोक्यात गेली.’’
बीडमध्ये गुंडांच्या टोळय़ा तयार झाल्या
शरद पवार म्हणाले, ‘‘सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते, परंतु काही लोकांना सत्ता दिल्यानंतर ती सत्ता त्यांच्या डोक्यात जाते. असेच काहीसे इथेही घडले. फार लवकर त्यांच्या डोक्यात सत्ता गेली. त्याचाच परिणाम आज जिह्यावर होतोय. जिह्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. जिह्यात गुंडांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत. सामान्य जनतेला त्रास देण्याचे प्रकार चालू आहेत. हे सगळे थांबले पाहिजे आणि हे थांबवण्यासाङ्गी आपण एकत्र आले पाहिजे.’’
पवार पुढे म्हणाले, ‘‘त्यांना वेळोवेळी संधी देताना डोक्यात एकच विचार होता. बीडसारख्या जिह्यात असा एखादा नेता तयार व्हायला हवा जो लोकांची कामे करेल. कारण या जिह्याने माझ्या पक्षाला सर्व आमदार दिले. या जिह्यात लोकांची सेवा करणारा प्रतिनिधी देणे ही आमची जबाबदारी आहे, असे मला वाटत होते. म्हणून मी त्यांना प्रोत्साहन देत गेलो.’’
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List