कोण आहे विमान कंपनींना धमकीचे मेल पाठवणारा जगदीश उईके? पोलिसांचा शोध सुरू
गेल्या काही दिवसांपासून विमानांच्या अनेक कंपन्यांना बाँबने उडवण्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. यासंदर्भाच आता महाराष्ट्र पोलीस सध्या जगदीश उईके नावाच्या एका लेखकाचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जगदीश सातत्याने विमान कंपन्यांना धमकीचे मेल पाठवत होता, त्यामुळे अनेक विमानांचे उड्डाण उशीरा झाले. त्यामुळे विमान कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदीश हा मूळचा महाराष्ट्रातील गोंदियाचा रहिवाशी आहे. गेले काही दिवस सातत्याने विमान कंपनींना मेल येत होते. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांसह सायबर पोलीसांनी हा मेल ट्रेस केला. यावेळी जगदीश नावाचा एक व्यक्ती हे मेल पाठवत असल्याचे समजले. त्यामुळे सध्या पोलीस धमकीचा मेल पाठवणाऱ्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत. केंद्रीय गृह विभागाने मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई आणि चौकशी केली जाईल, असे म्हटले आहे.
विमान कंपनींना धमकी देणाऱ्या आरोपीला शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस केंद्रिय तपासयंत्रणांची मदत घेतली . तपास यंत्रणा आणि पोलिसांचे पथक जगदीशच्या घरीही गेले, मात्र तो तेथे सापडला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने एजन्सींना आव्हान देण्यासाठी हे मेल केले. केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिसांची अनेक पथके त्याच्या मागावर असून, ते सध्या विदर्भात त्याचा शोध घेत आहेत. तसेच दिल्ली, मध्य प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये त्याचा शोध सुरू आहे.
जगदीशने रेल्वे स्थानक आणि बसस्थानकांनी धमकीचे मेलही पाठवले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटासाठी त्याला कोट्यवधी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. याआधीही जगदीशला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने दहशतवादावर एक पुस्तकही लिहिले होते. धमकीच्या ईमेलची माहिती मिळाल्यानंतर जगदीश फरार झाला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List