ऐन सणासुदीत टीव्ही पाहणे महागणार, ग्राहकांच्या खिशावर टेरिफ वाढ अन् 18 टक्के जीएसटी भार
या वर्षी जुलै महिन्यात मोबाईल रिचार्ज महाग झाले. त्यानंतर आता टीव्ही बघणे महाग होणार आहे. केंद्र सरकारने नुकताच चॅनेलच्या टेरिफमध्ये वाढ आणि 18 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला तामीळनाडूसह देशभरातून विरोध होऊ लागलाय. ट्रायने केबल टीव्ही चॅनेलच्या टेरिफमध्ये वाढ केली आहे, तसेच जीएसटी 18 टक्के लावला आहे. याविरोधात केबल टीव्ही ऑपरेटरने नाराजी व्यक्त केली असून जीएसटी 5 टक्के करण्याची मागणी केलीय. चेन्नईचे केबल टीव्ही ऑपरेटर्स या नियमाला विरोध करत आहेत. जीएसटी कमी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. जीएसटी वाढण्याचा थेट परिणाम ग्राहकांवर टाकला जाईल. जर तुमचे महिन्याचे रिचार्ज 500 रुपये असेल तर तुम्हाला 90 रुपये जास्त द्यावे लागतील. एक हजार रुपयाच्या रिचार्जवर 180 रुपये जास्त द्यावे लागतील. 1500 रुपयांच्या रिचार्जवर 270 रुपये जास्त भुर्दंड पडेल. त्यामुळे केबल टीव्ही पाहणाऱयांच्या खिशावर अतिरिक्त भार पडेल. ऐन सणासुदीत टीव्ही पाहण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने ग्राहकांत नाराजी आहे.
काही महिन्यांपूर्वी मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग झाले. त्यानंतर जियो, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया युजर्स नाराज झाले. मोबाईल रिचार्ज पाठोपाठ आता केबल टीव्ही पाहणेही महागणार आहे.
केंद्र सरकारने केबल टीव्ही ऑपरेटर टेरिफ आणि जीएसटीमध्ये वाढीचा निर्णय घेतलाय.
वाढीव दर आणि 18 टक्के जीएसटी शुल्क ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List