उमेदवार म्हणून येणार अन् गेम करणार! मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी

उमेदवार म्हणून येणार अन् गेम करणार! मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी

उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक म्हणून येणार आणि मनोज जरांगे पाटील यांचा गेम वाजवणार, अशी धमकी आल्यामुळे आंतरवाली सराटीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये ही धमकी देण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. आंतरवाली सराटी येथे सध्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्यामुळे गावात सध्या प्रचंड गर्दी आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये अज्ञाताने ‘उमेदवार म्हणून येणार आणि मनोज जरांगे यांचा गेम करणार’ अशी धमकी दिली आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून मुलाखतीसाठी येणारांनाही तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

एका जातीवर जिंकता येत नाही, सर्वांना सोबत घेणार
सध्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. 29 किंवा 30 ऑक्टोबरला मतदारसंघ जाहीर करणार असून तेव्हाच उमेदवारही जाहीर करण्यात येतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. केवळ एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच विधानसभा लढवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मराठा-ओबीसी असा वाद नसल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असता तर आम्ही कशाला या भानगडीत पडलो असतो? पण देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांनी अडथळे आणले. ज्यांनी अडथळे आणले त्यांची पाडापाडी निश्चित असल्याचाही जरांगे यांनी पुनरुच्चार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले… CM Eknath Shinde : महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्या, मुख्यमंत्री आता मैदानात, म्हणाले ते तर प्रिंटिंग मिस्टिकवाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीविरोधात जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडीने आमच्या योजना ढापल्याचा आरोप शिंदे यांनी केला. एक दिवसापूर्वी...
याला कसलाच नाही पश्चाताप, जयदीप आपटेचा कांगावा कमी होईना, म्हणाला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यामुळे कोसळला, जामिनासाठी घेतली हायकोर्टात धाव
दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल शाहरुख खानकडून धक्कादायक खुलासा, ‘अचानक गाणं वाजू लागलं आणि…’
“मी कधीच घाबरून काम केलं नाही, कारण मी हिंदू..”; धर्मावरून खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकली एकता कपूर
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत मोठा ट्विस्ट; केदारचं सत्य सर्वांसमोर येणार?
देवाभाऊ, पुरेशा पाण्याचा वायदा किती वेळा देणार? मतदारांचा सवाल; 5 वर्षांपासून शहराला दिवसाआड पाणीपुरवठा
ईडीच्या भीतीनंच पलायन; प्रत्येकाला मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून पक्ष, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला! – संजय राऊत