दोघी बहिणी एकाच क्षेत्रात,तरीही भेटत नाही; विद्या बालनच्या सुपरस्टार बहिणीने सांगितलं कारण
विद्या बालनने बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं असं एक स्थान निर्माण केलं आहे. विद्या बालन म्हटल्यावर चित्रपटात काहीतरी नक्कीच वेगळं पाहायला मिळणार असा चाहत्यांचा विश्वास नक्कीच असतो. पण एक आश्चर्याची बाब म्हणजे विद्याची बहीणही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघीही एकाच क्षेत्रात असून एकमेकींना फार भेटत नाही.
साऊथ इंडस्ट्रीमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री प्रियामणी ही विद्या बालनची चुलत बहीण आहे. याविषयीचा खुलासा खुद्द प्रियामणीने एका मुलाखतीमध्ये केला. बहिणी असूनही त्या एकमेकींना फार कमी वेळा भेटल्या आहेत असंही ती म्हणाली होती.
दरम्यान प्रियामणीनं विद्या बालन फक्त दोनदाच भेटल्या आहे. प्रियामणीनं या भेटींबाबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. ती म्हणाली की, "एक अवॉर्ड सेरेमनी होती, मला धुसरं आठवतंय की, कदाचित विजागमध्ये होती, जिथे त्या देखील आल्या होत्या. मला वाटतंय की, त्यांनी एनटीआर सरांच्या लाईफवर एक तेलगु फिल्म केली होती, त्यासाठीच ती त्या अवॉर्ड फंक्शनला आल्या होत्या.
प्रियामणी पुढे म्हणाली की, "ज्यावेळी त्यांना समजलं की, मीसुद्धा तिथेच आहे, त्यावेळी त्यांनी मला अवॉर्ड दिलं, जे नेमकं कशासाठी दिलं तेसुद्धा मला आठवत नाही. अवॉर्ड फंक्शनमध्ये मी पहिल्यांदा विद्या बालनला स्टेजवर पाहिलं होतं. त्या खरंच खूप सुंदर आहेत. मला आठवतंय की, ज्यावेळी त्या मला भेटलेल्या त्यावेळी त्यांनी मला विचारलं होतं की, प्रिया तू कशी आहेस? त्यावर मी म्हणालेली , मी छान आहे, तुम्ही कशा आहात? त्यावेळी आम्ही एकमेकींना मिठी मारली होती."
असं म्हणतं प्रियामणीने त्यांच्या पहिल्या भेटींचा तो क्षण सांगितल.तसेत प्रियामणीनं सांगितलं की त्यांची दुसरी भेट ही शाहरुख खानच्या एका पार्टीमध्ये झाली. दरम्यान प्रियामणीनं शाहरुख खानसोबत फिल्म 'जवान'मध्ये स्क्रिन शेअर केली होती. यापूर्वी ती फिल्म 'चेन्नई एक्सप्रेस'मध्येही त्याच्यासोबत एका गाण्यात दिसली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List