अन् गौहर जानचा प्रवास उलगडला… अर्पिता चॅटर्जींचा मंत्रमुग्ध करणारा अभिनय

अन् गौहर जानचा प्रवास उलगडला… अर्पिता चॅटर्जींचा मंत्रमुग्ध करणारा अभिनय

भारतातील पहिल्या रेकॉर्डिंग कलाकार गौहर जान यांचं विलक्षण आयुष्य एकल संगीत नाटकाद्वारे रंगमंचावर सादर होत आहे. ‘माय नेम इज जान’ असं या सोलो म्युजिकल प्लेचं नाव आहे. आज या नाटकाचा पहिला शो रंगतोय, या नाटकामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अर्पिता चॅटर्जी यांची प्रमुख भूमिका आहे. या नाटकात गौहर जान यांचा भारतीय शास्त्रीय संगीतातील अभूतपूर्व प्रवास पहायला मिळणार आहे.  त्याचसोबत त्यांच्या 11 सर्वांत प्रसिद्ध गाण्यांद्वारे त्यांचं आयुष्य रंगमंचावर सादर केलं जाणार आहे. अर्पिता चॅटर्जींचं हे सादरीकरण नाट्यरसिकांना लाइव्ह पाहता येणार आहे. आपल्या हरहुन्नरी प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्पिता या गौहर यांच्या आयुष्यातील चढउतार, आव्हानं, यश हे सर्व पैलू या नाटकातून दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

1902 साली भारतातील पहिले गाणे रेकॉर्ड करणाऱ्या प्रख्यात गायिक गौहर जान यांची किर्ती जगभरात पसरली आहे. त्यांच्याच आयुष्यावर आधारित, त्यांचा वारसा सांगणारं हे एकल संगीत नाटक आहे. या नाटकाचा पहिला शो आज वांद्रे पश्चिम इथल्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर होत आहे. तर दुसरा शो येत्या 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता बालगंधर्व रंगमंदिरातच होणार आहे.

गौहर जान यांनी 1902 मध्ये भारतातील ग्रामोफोन कंपनीसोबत त्यांचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होतं. हे गाणं रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार म्हणून त्यांनी इतिहास रचला. या नाटकात सादर होणाऱ्या गाण्यांमध्ये गौहर यांच्या प्रेमकहाणीसोबतच संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीचाही समावेश असेल. गौहर यांचं वैयक्तिक आयुष्य आणि संगीत क्षेत्रातील त्यांचं अमूल्य योगदान यांची सांगड घालून या नाटकात त्यांच्या आयुष्याचं सुरेख चित्रण करण्यात आलं आहे. अर्पिता चॅटर्जी या गौहर जान यांची गाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये सादर करणार आहेत. हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये गौहर यांची गाणी सादर होणार आहेत.

अभिनय आणि लाइव्ह गायन यांची सांगड घालून नाटक सादर करण्याची अर्पिता चॅटर्जी यांची कला ‘माय नेम इज जान’ला इतरांपेक्षा अनोखं ठरवते. यामुळे नाट्यरसिकांसाठी हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव ठरू शकतो.अर्पिता या त्यांच्या अभिनय आणि गायनकौशल्यातून केवळ गौहर जान यांच्या आयुष्याचं कथन करणार नाहीत, तर त्या रसिकांसमोर एका अष्टपैलू कलाकाराचं आयुष्य उलगडणार आहेत. मंचावर आपण गौहर यांनाच पाहत आहोत की काय, इतका तल्लीन करणारा हा अनुभव नाट्यरसिकांसाठी असेल.

असं करा बुकिंग

माय नेम इज जान’ हे नाटक 25 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आणि 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वांद्रे पश्चिम इथल्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहे. या नाटकाची तिकिटं ‘बुक माय शो’ (BookMyShow) या ॲपवर उपलब्ध आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली ‘इथे’ फिल्मस्टार्सच्या नावावर होते गाढवांची विक्री; ​सलमान-शाहरुखपेक्षाही लॉरेन्स गाढवावर लाखोंची बोली
मध्य प्रदेशातील चित्रकूट येथे गाढवाचा मेळा भरवला जातो. चित्रकूट जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून गाढवाचा सुरु होतो, जो पुढील काही...
शास्त्र असतं ते! खेळाडू नेहमी च्युइंगम का चघळतात? फॅशन नसून आहे खास कारण
हे अख्खं सरकार कचराकुंडीत टाकण्यासारखं आहे, द्या कचराकुंडीत टाकून; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
भाजप एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वापरून घेत आहे: जयंत पाटील
Justice Chandrachud Retires: सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड निवृत्त, शेवटच्या दिवशी झाले भावुक; म्हणाले….
Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण