Bigg Boss 18: ‘मला नाती जपता आली नाही आणि…’, भावना व्यक्त करताना करणवीरच्या डोळ्यात पाणी
Bigg Boss 18: टीव्हीवरील वादग्रस्त शो ‘बिग बॉस 18’ च्या घरात दमदार ड्रामा सुरु आहे. स्पर्धक एकमेंकावर अनेक आरोप करताना दिसत आहे. टास्क सुरु असताना स्पर्धकांचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे खासगी आयुष्याबद्दल सांगताना स्पर्धक भावूक होताना देखील दिसत आहे. सध्या सर्वत्र बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांची चर्चा रंगली आहे. नुकताच करणवीर याने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. खासगी आयुष्याचा खुलासा करताना करणवीर याच्या डोळ्यात पाणी देखील आलं.
बिग बॉस 18 चा प्रोमो समोर आला आहे. प्रोमोमध्ये करणवीर, श्रृतीका हिच्यासोबत बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या झालेल्या मैत्रीचं उदाहरण देत म्हणाला, ‘एका कुटुंबाला एक जोडून ठेवू शकतो… एवढी क्षमता माझ्यामध्ये नाही… हे सत्य मला आता कळलं आहे. मला असं वाटलं येथे देखील माझं कुटुंब झालं आहे. (चूम, शिल्पा, श्रुतिका) हे माझ्यासोबत घरात आणि बाहेर देखील राहतील असं मला वाटलं. पण मी कुटुंबाला सांभाळू शकलो नाही….’ भावना व्यक्त करताना करणवीर याच्या डोळ्यातून पाणी आलं.
करणवीर याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचे दोन लग्न झाली आहेत. पण त्याचे दोन्ही लग्न फार काळ टिकले नाहीत. ‘बिग बॉस’च्या घरात करणवीर अनेकदा त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसला. प्रसिद्धी झोतात आल्यापासून त्याच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे.
करणवीर याचं पहिलं लग्न
करणवीर याचं पहिलं लग्न 2009 मध्ये मैत्रिण देविका हिच्यासोबत झालं होतं. देविका हिला 10 वर्ष डेट केल्यानंतर करणवीर याने लग्नाचा निर्णय घेतला. पण लग्नाच्या 8 वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2018 मध्ये करणवीर आणि देविका यांचा घटस्फोट झाला.
करणवीर यांचं दुसरं लग्न
पहिलं लग्न अपयशी ठरल्यानंतर करणवीर याने 2021 मध्ये दुसरं लग्न अभिनेत्री निधी सेठ हिच्यासोबत केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. निधी हिने करणवीर मेहरा सोबत लग्न करणं चुकीचा निर्णय होता… असं सांगितलं. अशात दोघांचे 2023 मध्ये मार्ग वेगळे झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List