Ratnagiri News – राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा बनावटीच्या मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

Ratnagiri News – राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, गोवा बनावटीच्या मद्यासह एक कोटीचा मुद्देमाल जप्त

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोव्याकडून आलेल्या आयशर टेम्पोमध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी मद्याचे 1058 बॉक्स (9949.0 लि.) सापडले. राज्य उत्पादन शुल्क पथकाने याप्रकरणी मद्य व आयशर टेम्पो असा एकूण रुपये 1 कोटी 2 लाख 35 हजार 440 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक व दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी बीट क्र 3 रेडींग स्टाफसह अवैध मद्यावर कारवाई करण्यासाठी रात्रगस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करत आहेत. गुरुवारी सकाळी 06.15 च्या सुमारास मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर बसस्थानकासमोर गोव्याकडून आलेल्या आयशर टेम्पोची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यात विक्रीकरिता असलेले विदेशी मद्याचे 1058 बॉक्स (9949.0 लि.) मिळून आले. या गुन्ह्यात परराज्यातील मद्य व आयशर टेम्पो असा एकूण 1 कोटी 2 लाख 35 हजार 440 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई). 81, 83, 90 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्या चा पुढील तपास एस.एन.इंगळे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पान शुल्क, भरारी पथक हे करीत आहेत

तसेच दि. २३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मुंबई-गोबा राष्ट्रीय महामार्गावर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना चंदेराई ते देवधे रस्त्यावरुन देवधे तिठ्यावर आलेली मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्य बनावटीचे 59.84 लि. विदेशी मद्य व 30.24 लि. देशी मद्य अवैधरित्या वाहतुक करताना मिळून आले. या गुन्ह्यात अवैध देशी/विदेशी मद्य व स्वीफ्ट कार असा एकूण 4 लाख 8 हजार 220 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी ‘कायदा 1949 ‘कलम 65 (अ) (ई) अन्वये गन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा भरारी पथकाचे अमित पाडळकर करत आहेत.

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक शेडगे, अधीक्षक व उप अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक इंगळे, भरारी पथक, महाराष्ट्राज्य तसेच जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक पाडळकर, सचिन यादव, दुय्यम निरीक्षक, जिल्हा भरारी पथक, चंद्रकांत कदम, दुय्यम निरीक्षक, बीट क्र.03 व त्यांचा रेडींग स्टाफ यांनी केले.

जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवेध मद्याची वाहतूक ब मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमाकv- 8422001133 व टोल फ्री क्रमांक- 18002339999 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाकडून करण्यात येत आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी/ खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ajit Pawar : महायुतीपेक्षा अजितदादांचा सूर का वेगळा? योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावर हल्ला तर बारामतीमधील प्रचारात का नको मित्रांचा गोतावळा? Ajit Pawar : महायुतीपेक्षा अजितदादांचा सूर का वेगळा? योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ विधानावर हल्ला तर बारामतीमधील प्रचारात का नको मित्रांचा गोतावळा?
राज्यात प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर भाजपाने त्यांचा फायरब्रँड...
‘क्राइम पेट्रोल’ फेम अभिनेत्याचं निधन; वयाच्या 35 व्या वर्षी केली आत्महत्या?
‘आई कुठे काय करते’च्या निरोपाचे क्षण जवळ येताच मधुराणी भावूक; म्हणाली “मालिका संपली तरी..”
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, रात्रीच्या सुमारास फोन आला आणि…
गायकाच्या हत्येनंतर आईने 58 व्या वर्षी दिला दुसऱ्या मुलाला जन्म, फोटो शेअर करत म्हणाले…
चंद्रशेखर बावनकुळेंच्या संस्थेला भूखंडाची खिरापत भोवणार, लोकायुक्तांनी तक्रारीची घेतली गंभीर दखल
भाजपचा हा विचार म्हणजे डॉ आंबेडकरांचा अपमान, राहुल गांधी यांची देवेंद्र फडणवीस यांची टीका