गायकाच्या हत्येनंतर आईने 58 व्या वर्षी दिला दुसऱ्या मुलाला जन्म, फोटो शेअर करत म्हणाले…
Sidhu Moose Wala Brother: दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचं कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे. सिद्धू याच्या हत्येनंतर गायकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अशात सिद्धू याच्या निधनानंतर गायकाच्या आईने आयव्हीएफच्या माध्यमातून दुसऱ्या मुलाला जन्म दिला.आता सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांनी चिमुकल्याचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या सर्वत्र सिद्धू मुसेवाला याच्या लहान भावाची चर्चा रंगली आहे. मूसवालाचे वडील बलकौर सिंग आणि आई चरण कौर यांनी त्यांच्या लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
फोटोमध्ये मुसेवाला याचे आई-वडील लहान मुलाला मांडीवर घेऊन बसलेले आहे. सध्या त्यांचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सिद्धू मूसवाला यांच्या धाकट्या भावाचे नाव शुभदीप आहे. सिद्धू मुसेवाला याच्या वडिलांनी चिमुकल्याचा फोटो पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
सिद्धू मुसेवाला याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कुटुंबाचा फोटो पोस्ट करत बलकौर सिंग यांनी कॅप्शनमध्ये, ‘डोळयांमध्ये सत्य दडलेलं आहे. जे आपल्या आयुष्यातील प्रत्येक सत्य समजून घेतं, चेहऱ्यावरचा निरागसपणा आणि शब्दांपलीकडचा अनमोल प्रकाश… सर्व बंधू – भगिनी यांचे आभार… आम्ही एका छोट्या रुपात पुन्हा आलो आहोत… देवावर आमचा विश्वास आहे… त्या आशीर्वादासाठी आम्ही कायम ऋणी राहू… असं लिहिलं आहे.
वयाच्या 58 व्या वर्षी दिला मुलाला जन्म…
29 मे 2022 मध्ये सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली. गायकाच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगने स्वीकारली. सिद्धू मुसेवाला त्याच्या आई – वडिलांचा एकटाच मुलगा होता. त्याच्या निधनानंतर गायकाच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशात सिद्धूच्या आईने वयाच्या 58 व्या वर्षी दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. मोठ्या मुलाच्या निधनानंतर चरण कौर यांनी 17 मार्च 2024 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
मूसवालाचे चाहते त्याच्या लहान भावाची पहिली झलक पाहण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुक होते. आता वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर त्यांच्या लहान मुलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यांची सोशल मीडियावर पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पोस्ट लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेम व्यक्त करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List