नाटकातून सादर होणार देशातल्या पहिल्या रेकॉर्डिंग कलाकार गौहर जान यांचं आयुष्य; कुठे करता येईल बुकिंग?

नाटकातून सादर होणार देशातल्या पहिल्या रेकॉर्डिंग कलाकार गौहर जान यांचं आयुष्य; कुठे करता येईल बुकिंग?

भारतातील पहिल्या रेकॉर्डिंग कलाकार गौहर जान यांचं विलक्षण आयुष्य एकल संगीत नाटकाद्वारे (Solo Musical Play) रंगमंचावर सादर होणार आहे. ‘माय नेम इज जान’ असं या सोलो म्युजिकल प्लेचं नाव असून अत्यंत प्रतिभावान कलाकार अर्पिता चॅटर्जी ते रंगमंचावर सादर करणार आहेत. हे नाटक येत्या 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आणि 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईतील वांद्रे पश्चिम इथल्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर केलं जाईल. या नाटकात गौहर जान यांचा भारतीय शास्त्रीय संगीतातील अभूतपूर्व प्रवास पहायला मिळणार आहे. त्याचसोबत त्यांच्या 11 सर्वांत प्रसिद्ध गाण्यांद्वारे त्यांचं आयुष्य रंगमंचावर सादर केलं जाणार आहे. अर्पिता चॅटर्जींचं हे सादरीकरण नाट्यरसिकांना लाइव्ह पाहता येणार आहे. आपल्या हरहुन्नरी प्रतिभेसाठी ओळखल्या जाणाऱ्या अर्पिता या गौहर यांच्या आयुष्यातील चढउतार, आव्हानं, यश हे सर्व पैलू या नाटकातून दर्शवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

अर्पिता चॅटर्जी या अभिनेत्री, शास्त्रीय नृत्यांगना आणि प्रशिक्षित शास्त्रीय गायिका आहेत. यामुळेच गौहर जान यांच्या भूमिकेसाठी त्या अत्यंत योग्य निवड ठरतात. अर्पिता यांनी उस्ताद रशीद खान आणि पंडित अरुण भादुरी यांसारख्या उस्तादांकडून प्रशिक्षण घेतलं आहे. गौहर यांच्या संगीत प्रतिभेचं सार त्या अचूकपणे आपल्या नाट्यातून सादर करू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गौहर जान यांचा प्रवास

‘माय नेम इज जान’ या सोलो म्युजिकल प्लेचं वैशिष्ट्य म्हणजे यात नाट्यरसिकांना लाइव्ह गायन अनुभवता येणार आहे. अर्पिता चॅटर्जी या गौहर जान यांच्या गाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये सादर करणार आहेत. हिंदी, बंगाली, इंग्रजी, गुजराती आणि पंजाबी अशा विविध भाषांमध्ये गौहर यांची गाणी सादर होणार आहेत. संगीत क्षेत्रातील गौहर यांची सुरुवात ते राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास या गाण्यांद्वारे पहायला मिळणार आहे.

गौहर जान यांनी 1902 मध्ये भारतातील ग्रामोफोन कंपनीसोबत त्यांचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होतं. हे गाणं रेकॉर्ड करणाऱ्या पहिल्या भारतीय कलाकार म्हणून त्यांनी इतिहास रचला. या नाटकात सादर होणाऱ्या गाण्यांमध्ये गौहर यांच्या प्रेमकहाणीसोबतच संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कामगिरीचाही समावेश असेल. गौहर यांचं वैयक्तिक आयुष्य आणि संगीत क्षेत्रातील त्यांचं अमूल्य योगदान यांची सांगड घालून या नाटकात त्यांच्या आयुष्याचं सुरेख चित्रण करण्यात येणार आहे.

अर्पिता चॅटर्जी यांची उत्कृष्ट कामगिरी

अभिनय आणि लाइव्ह गायन यांची सांगड घालून नाटक सादर करण्याची अर्पिता चॅटर्जी यांची कला ‘माय नेम इज जान’ला इतरांपेक्षा अनोखं ठरवते. यामुळे नाट्यरसिकांसाठी हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अर्पिता या त्यांच्या अभिनय आणि गायनकौशल्यातून केवळ गौहर जान यांच्या आयुष्याचं कथन करणार नाहीत, तर त्या रसिकांसमोर एका अष्टपैलू कलाकाराचं आयुष्य उलगडणार आहेत. मंचावर आपण गौहर यांनाच पाहत आहोत की काय, इतका तल्लीन करणारा हा अनुभव नाट्यरसिकांसाठी असेल.

या नाटकात लोककथा आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय शास्त्रीय संगीत आणि रंगभूमीप्रेमींसाठी ‘माय नेम इज जान’ या नाटकाचा अनुभव सर्वार्थाने समृद्ध करणारा असेल. या नाटकातून एका अशा स्त्रीचा कलात्मक वारसा साजरा करण्यात येणार आहे, ज्यांनी भविष्यातील पिढ्यांसाठी कलेचा मार्ग मोकळा आहे.

‘माय नेम इज जान’चं बुकिंग कसं आणि कुठे करता येईल?

माय नेम इज जान’ हे नाटक 25 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता आणि 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वांद्रे पश्चिम इथल्या बालगंधर्व रंगमंदिरात सादर होणार आहे. या नाटकाची तिकिटं ‘बुक माय शो’ (BookMyShow) या ॲपवर उपलब्ध आहेत. या नाटकातील तुमची जागा रिझर्व्ह करण्यासाठी लवकर बुकिंग करण्याची शिफारस केली जाते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार Arjun Kapoor : मलायकासोबत ब्रेकअप, त्यानंतर अर्जुन कपूरला झाला एक गंभीर आजार
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आता एकत्र नाहीयत. काही दिवसांपूर्वी एका इवेंटमध्ये अर्जुनने तो आता सिंगल असल्याच सांगितलं. एकप्रकारे त्याने...
Shah Rukh Khan Threat: अभिनेता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी, 50 लाख मागणाऱ्याने नाव सांगितले ‘हिंदुस्थानी’
भाजपने डॉग स्क्वाड बागळलेत; जयंत पाटील यांचा सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला
इन्स्टाग्राममुळे सापडली वर्षभरापूर्वी चोरीला गेलेली म्हैस! पोलिसांनी शेतकऱ्याला दिला 8 दिवसांचा वेळ
मुंडे बहीण-भावानं आमची कोट्यवधींची जमीन हडपली! प्रवीण महाजन यांच्या पत्नीने केलेल्या आरोपांमुळे खळबळ
काँग्रेसनं बंडोबांना ‘पंजा’त पकडलं; मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधातील बंडखोर 6 वर्षांसाठी निलंबित!
आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान, आता सदाभाऊंची राष्ट्रवादीवर सडकून टीका