किडनीच्या आजाराची 7 लक्षणे कोणती? या उपायाने मिळेल दिलासा, वाचा एका क्लिकवर

किडनीच्या आजाराची 7 लक्षणे कोणती? या उपायाने मिळेल दिलासा, वाचा एका क्लिकवर

किडनी म्हणजे मूत्रपिंड आजाराचे योग्य वेळी निदान झाल्यात तुम्ही योग्य उपचार घेऊ शकतात. तसेच या आजारावर वेळीच उपाय करू शकतात. आज आम्ही तुम्हाला किडनी म्हणजेच मूत्रपिंडाची 7 लक्षणे कोणती आहेत, हे सांगणार आहोत. तसेच किडनी आजारावरील उपायही सांगणार आहोत. याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

खराब आहार आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम देखील आपल्या शरीरावर होतो. अनेक लक्षणे तुमच्या शरीरात मूत्रपिंड म्हणजेच किडनी खराब होण्यासंदर्भात दिसू शकतात. पण, याची तुम्हाला माहिती हवी. ही लक्षणे लवकर ओळखून वेळीच योग्य उपचार आणि खबरदारी घेतल्याने आपण मूत्रपिंड पुन्हा निरोगी बनवू शकतात. आज आम्ही तुम्हाला मूत्रपिंडाच्या अशाच लक्षणांबद्दल सांगणार आहोत. हे लक्षणे तुम्हाला मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही, हे सूचित करते. दरम्यान, ही लक्षणे कोणती आहेत, याविषयी खाली विस्ताराने जाणून घ्या.

मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे कोणती?

लघवीतील बदल : लघवीचा रंग, प्रमाण किंवा वास बदलणे हे मूत्रपिंडाच्या समस्येचे लक्षण असू शकते. जसे की लघवीमध्ये फोम येणे, रक्तस्त्राव होणे किंवा खूप कमी किंवा जास्त लघवी.

सूज : पाय, गुडघे किंवा चेहऱ्याला सूज येणे हे मूत्रपिंडात पाणी साचण्याचे लक्षण असू शकते. थकवा आणि अशक्तपणा: जेव्हा मूत्रपिंड योग्यप्रकारे कार्य करत नाही तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता असू शकते, ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येतो.

उच्च रक्तदाब : रक्तदाब नियंत्रित करण्यात मूत्रपिंड महत्त्वाची भूमिका बजावते. जर मूत्रपिंड व्यवस्थित काम करत नसेल तर रक्तदाब वाढू शकतो.

मळमळ आणि उलट्या : मूत्रपिंडाच्या आजारामुळे मळमळ आणि उलट्या यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

चक्कर येणे : मूत्रपिंडाच्या आजारामुळे रक्तातील विषारी पदार्थांचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे भूक कमी होते. यामुळे शरीरात अशक्तपणा येतो आणि चक्कर येण्याची समस्या उद्भवू शकते.

त्वचेत खाज सुटणे : मूत्रपिंडाच्या आजारामुळे त्वचेला खाज येऊ शकते.

लघवीतील प्रथिने : लघवीमध्ये प्रथिने असणे हे मूत्रपिंड योग्यरित्या कार्य न करण्याचे लक्षण असू शकते.

आम्ही तुम्हाला मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे सांगितली. आता मूत्रपिंडाचा आजार टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आपण घेऊ शकता अशी काही खबरदारी, याविषयीची माहिती खाली विस्ताराने सांगत आहोत.

मूत्रपिंड निरोगी ठेवण्याचे उपाय कोणते?

रक्तदाब नियंत्रित करा : उच्च रक्तदाब मूत्रपिंडाचे नुकसान करू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

मधुमेहावर नियंत्रण ठेवा : मधुमेह हे मूत्रपिंडाच्या आजाराचे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वजन नियंत्रित ठेवा : लठ्ठपणामुळे मूत्रपिंडावर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे निरोगी वजन राखणे गरजेचे आहे.

नियमित व्यायाम : नियमित व्यायामामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास, वजन कमी होण्यास आणि मूत्रपिंड निरोगी राहण्यास मदत होते.

भरपूर पाणी प्या : भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांना विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. मीठाचे सेवन कमी करा: जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे.

धुम्रपान करू नका : धूम्रपान केल्याने मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्या औषधे: काही औषधे मूत्रपिंडाचे नुकसान करू शकतात. त्यामुळे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत.

(टीप- लेखातील नमूद उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य Ladki Bahin Yojana : ‘ते कदापि शक्य नाही’, खर्चाचा लेखाजोखा मांडत अजित पवारांचं लाडकी बहीण योजनेवर मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी अजित पवार...
अजितदादामध्ये बदल का झाला…अजित पवार यांनी सांगितले ते कारण
AJIT PAWAR EXCLUSIVE : महायुतीत सूर का जुळत नाही? अजित पवार म्हणाले….
भाजपचा नवाब मलिकांना नकार असताना तुम्ही तिकीट का दिलं? अजित पवारांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
बॉलिवूडवर पुन्हा ‘अंडरवर्ल्ड’ दहशत? सलमान, शाहरुखनंतर आता ‘या’ अभिनेत्याला धमकी
अविवाहित असतानाही कोणाच्या नावाचे सिंदूर लावते ‘ही’ अभिनेत्री; नेटकऱ्यांनी घेतलं एजाज खानचे नाव
अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवातील अडथळे दूर करा