निरोगी दीर्घ आयुष्य जगण्यासाठी ब्लू झोनमधील लोक चिकन-मटन सोडून खातात हे सहा भाज्या
ब्लू झोन बेवसाइटनुसार, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे सल्लागार वाल्टर विल्लेट म्हणतात, मासांहार करणे एखाद्या रेडिएशनसारखे आहे. त्याची सेफ लेव्हल आम्हाला माहीत नसते. संशोधनात पाहिले गेले आहे की मासांहारी खाणाऱ्यापेक्षा शाकाहारी खाणारे आठ वर्ष जास्त जगतात.
ब्लू झोनच्या आहारात 6 भाज्यांचा समावेश आहे. याला दीर्घायुष्यासाठी सर्वोत्तम पदार्थ म्हटले गेले आहे. यामध्ये पालक, कोबी, सलगमची पाने (हिरवी भाजी), चार्ड (हिरवी पालेभाजी), कॉलर्ड्स (कोबीसारखी भाजी) आणि बीट सारख्या भाज्यांचा समावेश आहे.
पालकामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के 1, फॉलिक ॲसिड, लोह, कॅल्शियम यासारखे प्रमुख पोषक घटक असतात. हे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. ज्यामुळे पेशींना नुकसान होते.
या तीन हिरव्या पालेभाज्या मधुमेह आणि कोलेस्टेरॉलच्या आजारांपासून संरक्षण करतात. हे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी करतात. या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे कर्करोगापासून संरक्षण करतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List