सकाळी खा हे 5 मोड आलेले धान्य, बॅड कोलेस्टेरॉल जाईल पळून, हृदयाच्या नसांमधील घाण होईल साफ
बॅड कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार येण्याचा धोका वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल ह्रदयामधील नसांमध्ये रक्त पुरवठा करण्यात अडचणी निर्माण करतो. बॅड कोरेस्ट्रॉल रोखण्यासाठी धान्य अंकुरित करुन तुम्हा खाऊ शकतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होईल.
कोंब फुटल्यानंतर मेथीचे दाणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. मेथी दाने खाल्यास तुमच्या पचनास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते. वजन कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी होतो.
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्याला मोड आल्यानंतर रोज सकाळी नाश्त्यात घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल. तसेच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.
तुम्ही कोंब सोयाबीनचे सेवन केले तर तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List