रश्मी शुक्ला यांना निवडणुकीशी निगडित कोणत्याही कामात ठेवू नये, अंबादास दानवे यांची मागणी

रश्मी शुक्ला यांना निवडणुकीशी निगडित कोणत्याही कामात ठेवू नये, अंबादास दानवे यांची मागणी

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवडणूक आयोगाने हटवलं आहे. हा निर्णय घ्यायला विलंब झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. तसेच पण शुक्ला यांच्या निवडणुकीशी निगडीत कुठलेही काम देऊ नये अशी मागणीही दानवे यांनी केली आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टवर दानवे म्हणाले की, राजकीय हेतूने काम करणाऱ्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली थोडी विलंबाने का होईना पण झाली. मात्र आमची निवडणूक आयोगाकडे ही मागणी असेल की रश्मी शुक्ला यांना निवडणुकीशी निगडित कोणत्याही कामात ठेवू नये. तसेच निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या बदल्यांचा पुनर्विचार होऊन त्या रद्द करण्यात याव्यात अशा प्रमुख मागण्या दानवे यांनी केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन