जगातील सर्वोत्तम शालेय क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ; हॅरिस शील्डसाठी मुंबईतील 187 शालेय संघांमध्ये संघर्ष

जगातील सर्वोत्तम शालेय क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ; हॅरिस शील्डसाठी मुंबईतील 187 शालेय संघांमध्ये संघर्ष

हिंदुस्थानी क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईचा खरा पाया शालेय क्रिकेट आहे आणि जगातील सर्वोच्च आणि सर्वाधिक शालेय संघ खेळत असलेल्या एक वर्षाखालील क्रिकेटपटूंची हॅरिस शील्ड या विश्वविक्रमी क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 4 नोव्हेंबरपासून  पारसी जिमखान्यासह मुंबईतील पाच मैदानांवर प्रारंभ होणार आहे. या ऐतिहासिक स्पर्धेचे उद्घाटन हिंदुस्थानचे माजी कसोटीपटू पारस म्हांब्रे, मुंबई क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आणि मुंबई शालेय क्रीडा संघटनेचे सचिव (क्रिकेट) नदीम मेमन यांच्या उपस्थितीत पार पडेल.

हिंदुस्थानी क्रिकेटचा सारे महामार्ग मुंबई क्रिकेटमधूनच जातात आणि या महामुंबईच्या क्रिकेटचा खरा पाया शालेय क्रिकेट स्पर्धा असलेली हॅरिस शील्ड आणि गाइल्स शील्ड (14 वर्षाखालील) ही स्पर्धा आहे. गेली 128 वर्षे ही स्पर्धा सातत्याने खेळली जात आहे आणि या स्पर्धेतून मुंबईच्या क्रिकेट खेळाडूंचा उदय होतोय. मुंबईचा प्रत्येक क्रिकेटपटू ही ऐतिहासिक स्पर्धा खेळतोच. शालेय क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा दरवर्षी होणाऱया जागतिक स्पर्धेसारखीच आहे. आज हिंदुस्थान आणि जगात क्रिकेट कितीही पह्फावले असेल किंवा वाढले असेल. मुंबई शालेय क्रीडा संघटना आयोजित करत असलेल्या हॅरिस शील्ड आणि गाइल्स शील्ड या स्पर्धेची तुलनाच होऊ शकत नाही. हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरात काही  शहरांमध्ये शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन सुरू झालेय. पण मुंबई इतकी भव्य आणि दिव्य स्पर्धा कुणी घेत नाही आणि घेण्याची क्षमताही नाही. यंदा हॅरिस शील्डमध्ये 187 तर गाइल्स शील्डमध्ये 150 पेक्षा अधिक संघ आपले काwशल्यपणाला लावणार आहेत.

शालेय क्रिकेटपटूंवर पुरस्कारांचा वर्षाव

आजवर शालेय क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात खेळाडूंना रोख पुरस्कार दिले जात नव्हते, मात्र प्रथमच शालेय क्रीडा संघटनेने शालेय क्रिकेटपटूंची मेहनत पाहता यंदा शालेय क्रिकेटपटूंनाही रोख पुरस्कार दिले जाणार आहे. 187 संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटूला दोन हजार रुपये तर बाद फेरीतील सर्वोत्तम खेळाडूला तीन हजार रुपयांचे व्हाऊचर्स दिले जाणार असल्याची माहिती मेमन यांनी दिली. एवढेच नव्हे तर स्पर्धेत सहभागी क्रिकेटपटूला सहभाग प्रमाणपत्रही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेचे ग्लॅमर वाढवाना प्रथमच रणजी क्रिकेटसाठी वापरले जाणार एसजी पंपनीचे चेंडूंही वापरले जाणार आहेत. या स्पर्धेचे सर्व साखळी सामने याच नोव्हेंबर महिन्यात खेळविले जाणार असून बाद फेरीचे सामने नव्या वर्षाच्या प्रारंभी खेळविले जातील, अशी माहितीही आयोजक मेमन यांनी दिली.

तगडय़ा संघांची भलीमोठी रांग

या स्पर्धेत गेले काही वर्षे स्वामी विवेकानंद, अल बरकत, डॉन बॉस्को, शारदाश्रम, पार्ले टिळकसारख्या शाळांचे वर्चस्व राहिले. यंदाही सर्वचा सर्व शालेय संघ आपले काwशल्य पणाला लावणार आहेत. गतवर्षी बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेने बाजी मारली होती. यावेळी त्यांचे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न अल बरकत शाळा करणार, हे निश्चित आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य नवऱ्याने माझ्यावर वेश्याव्यवसाय…, ‘बडे अच्छे लगते है’ फेम अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
Bade Achhe Lagte Hain fame Actress: ‘बडे अच्छे लगते है’ मालिकेने चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. मालिकेतील अभिनेते राम कपूर आणि...
पाटण्यात पुष्पा-2 च्या ट्रेलर लॉन्चिंगवेळी गर्दी अनियंत्रित, पोलिसांनी केला लाठीचार्ज; व्हिडिओ आला समोर
महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही; सुप्रिया सुळे यांचा महायुतीवर निशाणा
शिंदे पिता-पुत्राचा असा पराभव करा की, भविष्यात गद्दारी करण्याचे कोणी धाडस करणार नाही; शरद पवार यांचा घणाघात
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेच्या पंचसूत्रीद्वारे जनसामान्यांना न्याय मिळेल : नाना पटोले
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाही; शरद पवारांचा सरकारवर निशाणा
देशाची आर्थिक राजधानी गुजरातला घेऊन जाण्याचे भाजपाचे षडयंत्र: रागिनी नायक