मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप

शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात, पण जेव्हा कंत्राटदारांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे असतात अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले की, या गद्दारांनी गद्दारी फक्त शिवसेनेशी नाही केली, ना उद्धव ठाकरे यांच्याशी ना शरद पवारांशी, या गद्दारांनी संपूर्ण महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. एका बाजूला लूट सुरू आहे, मग तो रस्ता घोटाळा असो, वेडिंग मशीन, वेताळ टेकडीचा त्यांना नाश करायचा आहे, पुण्यातल नदी विकास प्रकल्प असेल. दुसरीकडे महिलांवर अन्याय आणि अत्याचार वाढले आहेत. राज्यात महाराष्ट्रांचेही नुकसान झाले आहे, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्यावरही शेतकऱ्यांना एकनाथ शिंदे सरकारने मदत केली नाही. हे सरकार ना शेतकऱ्यांचे आहे ना महिलांचे ना युवांचे, हे सरकार फक्त कंत्राटदारांचे. या सरकारचे मालक जरी अदानी असले तरी यांचे आवडते कोन्ट्रॅक्टर आवडते बिल्डर यांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच्या सभेत सांगितले आहे की महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर धारावीकरांना हक्काचे घर देऊ आणि अदानीला दिलेले कंत्राट रद्द करू. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना क्लस्टरच्या नावाखाली जी गावठाणं खायची आहेत ते आम्ही होऊ देणार नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे नसतात, पण जेव्हा कंत्राटदारांना पैसे द्यायची वेळ येते तेव्हा यांच्याकडे पैसे असतात. नगरविकास खात्यात घोटाळा झाला आहे. हे खातं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित येतं. मुंबई आणि प्रदेशात मेट्रोची कामं सुरू आहेत. अनेक ठिकाणी ही कामं पूर्ण झालेली नाहीत. कामं पूर्ण झाली नसताना त्यांची पिलर्स रंगवली आहेत. जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा पुन्हा यांना रंग दिला जाईल. ही रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74 कोटी रुपये 41 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. यांच्याकडे बेस्टला द्यायला पैसे नाहीत, जुन्या पेन्शनसाठी, बोनससाठी पैसे नाहीत. मग या प्रकल्पात होणाऱ्या अतिरिक्त खर्च कशासाठी आणि कुणासाठी. आणि हा घोटाळा नाहिये तर काय आहे.? 23 तारखेला आमचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे, या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी करून आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काम पूर्ण होण्याआधीच रंग रंगोटी करणे यात कुठला तर्क आहे? मुंबईतल्या अनेक मेट्रोंचे काम पूर्ण झालेले नाही मग त्यांच्यावर रंगरंगोटी करण्याची गरज काय? पण एवढं मोठं कंत्राट आणि त्यावर 74 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च? हे जनतेचे पैसे असून त्यांच्या खोक्यातले पैसे नाहियेत. सरकारकडे सामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत मग हे पैसे कंत्राटदाराच्या खिशात जातात तरी कसे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला

मुंबई आणि महाराष्ट्र प्रभावित करण्यासाठी90 हजार लोक गुजरातहून आले आहेत असे पंकजा मुंडे काल म्हणाल्या. जर राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला तर महाराष्ट्र जिंकेल आणि महायुतीचा विजय झाला तर गुजरातचा विजय होईल ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. गुजरातमधून 90 हजार लोक का आलेत महाराष्ट्रातील लोकांना प्रभावित करण्यासाठी? एवढं काय आहे महाराष्ट्रात की गुजरातहून 90 हजार लोकांना इथे भाजपच्या प्रचारासाठी यावं लागलं असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा Name in voter list 2024 : मतदार यादीत तुमचे नाव आहे का? घर बसल्या असे झटपट चेक करा
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तुम्ही व्होट करायला जाण्याआधी तुमचे नाव मतदार यादीत आहे का...
मुंबईसह महाराष्ट्रात तापमानात सातत्याने चढ-उतार, हवामान खात्याचा काय?
यंदाच्या निवडणुकीत कोट्यवधींची मालमत्ता जप्त, निवडणूक आयोगाच्या पथकाची जबरदस्त कामगिरी
राज ठाकरेंनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना गद्दार म्हटले? भर सभेत मागचं सगळं काढलं
एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है; विनोद तावडेंचा प्रति शाब्दिक हल्ला
“अर्जून कपूरच्या आठवणीत टल्ली…” रेस्टॉरंटमधून बाहेर आलेल्या मलायकाला चालता येईना, मित्राने सावरलं; नेटकऱ्यांकडून ट्रोल
रक्ताळलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल; बॉलिवूड अभिनेत्रीचा भिषण कार अपघात, सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त