मिंधे-फडणवीसांचा वेळ 23 तारखेनंतर कोर्टात आणि पोलीस स्थानकात हेलपाटे मारण्यात जाणार! – संजय राऊत

मिंधे-फडणवीसांचा वेळ 23 तारखेनंतर कोर्टात आणि पोलीस स्थानकात हेलपाटे मारण्यात जाणार! – संजय राऊत

मिंधे-फडणवीस यांचा बरासचा वेळ 23 तारखेनंतर कोर्टात किंवा पोलीस स्थानकात हेलपाटे मारण्यात जाणार आहे. एवढे गुन्हे, भ्रष्टाचार, खोटी कामं करून ठेवलेली आहेत. त्याचा तपास करत होणारच. त्यांचा बरासचा काळ खुलासे करण्यात जाईल आणि यावेळी दया, माया नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिला.

सांगोला विधानसभेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ संजय राऊत यांची आज जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिल्ली आणि गुजरातमधून आलेले लोक आमच्याच राज्यात आमच्यावर चिखलफेक करतात. पंकजा मुंडेंनी चांगली माहिती दिली. गुजरातमधून महाराष्ट्रात 90 हजार लोक आले आहेत. प्रत्येक बुथवर गुजरातचे लोक थांबणार आहेत. महाराष्ट्राचा गुजरात होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असून अशा परिस्थितीत आम्ही निवडणूक लढत आहोत. आमची लढाई महाराष्ट्राला वाचवण्यासाठी आहे. सत्ता येते आणि जाते, पण आता जर गुजराती दलालांना बाहेर काढले नाही तर मराठी माणसाचा महाराष्ट्र आपल्या हातात राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीचा प्रचार उत्तम झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याही मोठ्या सभा झाल्या. आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. तसेच एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होणार नाही. नवीनच कुणी चांगला विरोधी पक्षनेता होईल, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले.

जयंत पाटील यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे असे विधान केले. पत्रकारांनी याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी त्यांचे नाव तत्काळ जाहीर केला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे की जर कुणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्या पक्षाने त्या नेत्याचे नाव जाहीर करावे. आम्ही पाठींबा देऊ. पण उद्धव ठाकरे यांचे काम देशाने, महाराष्ट्राने पाहिले आहे. कोरोना काळात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून नाही तर कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी बजावली आणि पूर्ण केली. महाराष्ट्रात गावागावात त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग शिवसेनेशिवाय निर्माण झाला. त्यांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपदावरून जावे लागले, तो त्यांचा नाही महाराष्ट्राचा अपमान होता, असेही राऊत म्हणाले.

आशिष शेलार यांच्या प्रचारासाठी कलाकारांची मोठी फौज उतरली आहे. डोनाल्ड ट्रम्प आले तरी हरकत नाही. बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडचे कलाकार येऊ द्या. तुम्हाला प्रचारासाठी कलाकार लागतात याचाच अर्थ तुम्ही काम केले नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच सांगोल्यात येण्याचे आव्हान शहाजी बाबू पाटलांनी दिले होते. आम्ही आलो, आता तुम्ही विधानसभेत पोहोचून दाखवा, असे प्रतिआव्हानही राऊत यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन