सत्ताधा-यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी! – रमेश चेन्नीथला

सत्ताधा-यांकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी! – रमेश चेन्नीथला

20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.

पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने निदर्शनास आणून दिले होत. त्यानंतर या संदर्भातल्या लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास येत आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. काँग्रेस पक्ष या संदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच. पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा, असे रमेश चेन्नीथला म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन ! हाय बीपीने आहात त्रस्त? 5 मिनिटांचा हा व्यायाम बदलेल तुमचे जीवन !
तुम्हाला जर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे तर तुमच्यासाठी रेग्युलर एक्सरसाईज गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे लोकांना 30 ते 60 मिनिटांचा व्यायाम करण्याचा...
मागाठाण्याचे उमेदवार उद्देश पाटेकर यांच्या नावे चुकीचं पत्र फिरवलं जातंय! – आदित्य ठाकरे
Photo – पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये नोरा फतेहीच्या सौंदर्यावर चाहते घायाळ
शिवतीर्थावरील सभेत त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकामं होतं! आदित्य ठाकरे यांचा मोदींना टोला
शिवसेनाप्रमुखांची मशाल हाती घ्या, तुमच्या मताने ही बेबंदशाही जाळून भस्म करून टाका; उद्धव ठाकरे यांचा घणाघात
मिंधेच्या नगरविकास विभागात 74 कोटी रुपयांचा घोटाळा, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप
Video – बेबंदशाहीविरोधात मी लढाईला उतरलोय, मला साथ द्या; उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन