Uttarakhand bus accident – पर्यटकांची बस खोल दरीत कोसळली, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. मार्चुलाजवळ पर्यटकांची बस खोल दरीमध्ये कोसळली. सोमवारी सकाळी हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. उंचावरून कोसळल्याने बसचा चेंदामेंदा झाला असून या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. ही बस नैनी डांडामधील किनाथ येथून रामनगरकडे निघाली होती. मात्र अल्मोडा जिल्ह्यातील मार्चुला भागात बस दरीमध्ये कोसळली. गीत जागीर नदीजवळ हा अपघात झाला असून बसचा पार चेंदामेंदा झाला आहे.
VIDEO | A passenger bus fell into a gorge near Ramnagar, Uttarakhand early morning today. Several casualties feared. More details awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/pS7Ct8NhWI
— Press Trust of India (@PTI_News) November 4, 2024
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरफ आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. आतापर्यंत पाच जणांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List