दहिसरमध्ये पालिकेची आता सीबीएसई शाळा, सात मजली अद्ययावत सुविधांची इमारत बांधणार

दहिसरमध्ये पालिकेची आता सीबीएसई शाळा, सात मजली अद्ययावत सुविधांची इमारत बांधणार

गोरगरीब-सर्वसामान्यांच्या कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पालिका सीबीएसई शाळा सुरू करीत असून आता दहिसरमध्येही अशी शाळा सुरू करण्यात येणार आहे. दहिसर पश्चिमेकडील रमाकांत तरे मार्ग येथे मुंबई महानगरपालिकेची सीबीएससी शाळा सुरू करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या ठिकाणची धोकादायक इमारत पाडून या ठिकाणी अद्ययावत सुविधा असलेली सात मजली इमारत बांधली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून पालिकेच्या साडेतीन लाखांवर विद्यार्थ्यांना गणवेशापासून बूट, छत्री, बेस्ट बस पास अशा तब्बल 27  प्रकारच्या वस्तू मोफत दिल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सीबीएसई बोर्डाच्या शाळाही सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये आता दहिसर पश्चिमेला सखाराम तरे मार्ग येथे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेची दोन मजली सी आकाराची इमारत होती. यापैकी बी बिल्डिंगचा पुनर्विकास करण्यात आला असून येथे सहा मजली इमारत उभारण्यात आली असून 2023 मध्ये येथे एसएससी बोर्डाची शाळा सुरू करण्यात आली आहे. आता ए बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी सात मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. यासाठी 17 कोटी 8 लाख 66 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली आहे. ही इमारत दोन वर्षांत पूर्ण करून तेथे सीबीएसई शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगली संधी निर्माण होत आहे.

असे होणार काम

या शाळेचे क्षेत्रफळ  4916.76 चौ.मी. इतके आहे. इमारतीच्या तळमजल्यावर प्रवेश लॉबी, बहुउद्देशीय सभागृह, वाचनालय, पहिल्या मजल्यावर चार वर्गखोल्या, मुलांकरिता व मुलींकरिता शौचालय, मुख्याध्यापकांकरिता खोली, स्टोअर रूम. दुसऱ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, एक संगणक खोली व शौचालय, कर्मचारी खोली, तिसऱ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या बांधण्यात येतील.  शिवाय एक कर्मचारी खोली व शौचालय, चौथ्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा व शौचालय पाचव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, शौचालय, कर्मचारी खोली व एक संगीतकला खोली. सहाव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, शौचालय, व सातव्या मजल्यावर सहा वर्गखोल्या, व्हर्च्युअल वर्गखोली, कर्मचाऱ्यांकरिता खोली व शौचालय राहणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवींसाचा मोठा गौप्यस्फोट 2019 ला राष्ट्रपती राजवट लागली तेव्हा नेमकं काय घडलं?; पत्र कुणी लिहिलं? फडणवींसाचा मोठा गौप्यस्फोट
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. ही राष्ट्रपती राजवट नेमकी कुणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबत प्रचंड चर्चा होत...
‘धर्मयुद्ध’ शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘महाभारत’; ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं आव्हान
“माझा जीव घे पण तिला वाचव..”; पत्नीच्या कॅन्सरबद्दल बोलताना नवज्योत सिंग सिद्धू भावूक
वाणी कपूरचा अपघात, अभिनेत्रीच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक, कशी आहे प्रकृती?
रवी दुबेची पत्नी सरगुनचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर? अखेर त्याने सोडलं मौन
सतत तोंड येतं? मग तातडीने करा ‘हे’ घरगुती उपाय 
महाराष्ट्र काँग्रेसची ‘भ्रष्टयुती’ विरोधात कॉमिक-शैलीतील जाहिरात मोहीम