Ami Je Tomar 3.0: ‘आमी जे तोमार’ गाणं प्रदर्शित, विद्या – माधुरी यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’, नृत्य पाहून चाहते थक्क
Ami Je Tomar 3.0: यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण अभिनेता कार्तिक आर्यन ‘रुह बाबा’च्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कार्तिक आर्यन स्टारर ‘भुल भुलैय्या 3’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या तिसऱ्या भागात अनेक नवे पैलू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. कार्तिक सोबतच अभिनेत्री विद्या बालन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित देखील चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘आमी जे तोमार 3.0’ गाण्यावर दोन्ही अभिनेत्रींमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘आमी जे तोमार’ गाण्याची चर्चा रंगली आहे.
प्रदर्शित झालं ‘आमी जे तोमार’ गाणं
सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधी ‘आमी जे तोमार’ गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांचं दमदार नृत्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. सांगायचं झालं तर, बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ कायम तिच्या नृत्याने चाहत्यांना घायाळ करत असते. पण आता माधुरी हिला विद्याची साथ मिळाली आहे. आमी जे तोमार गाण्यावर माधुरीने कथक तर विद्याने भरतनाट्यम नृत्य सादर केलं आहे. सध्या सर्वत्र माधुरी आणि विद्या यांचं कौतुक होत आहे.
सांगायचं झालं तर, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आमी जे तोमार’ गाण्यावर मंजुलिका हिला नृत्य करताना चाहत्यांनी पाहिलं. तेव्हा गाण्यात विद्या बालन एकटी होती. पण आता माधुरी दीक्षित देखील दिसत आहे. ‘आमी जे तोमार’ गाणं पाहिल्या आणि ऐकल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज इतक्या वर्षांनंतर देखील गाण्यातील तेज कमी झालेले नाही. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल हिने गाण्याला आवाज दिला आहे.
कधी प्रदर्शित होणार सिनेमा
‘भूल भुलैय्या 3’ सिनेमा 1 नोव्हेंबर रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर देखील ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. कारण अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण स्टारर ‘सिंघम अगेन’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे.
‘भूल भुलैय्या 3’ आणि ‘सिंघम अगेन’ दोन्ही सिनेमांमध्ये तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस कोणता सिनेमा बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दोन्ही सिनेमांमध्ये ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकतो… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण कोणता सिनेमा चाहत्यांचं अधिक मनोरंजन करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List