मलायकाच्या वाढदिवसानंतर अर्जुन कपूरच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष; ‘कधीच विसरू नकोस..’
अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलंय. अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाने कोणतीच पोस्ट लिहिली नव्हती आणि त्याचसोबत त्याच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्येही ती कुठेच दिसली नाही, तेव्हापासून दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय. या चर्चांदरम्यान दोघांनी एक फॅशन शोलाही हजेरी लावली होती. मात्र नेहमीच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे मलायका आणि अर्जुन या शोदरम्यान एकमेकांपासून लांब बसलेले दिसले. आता अर्जुनच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. मलायकाच्या वाढदिवसानंतर त्याने ही पोस्ट लिहिल्याने नेटकरी त्याचा संबंध दोघांच्या ब्रेकअपशी जोडत आहेत.
‘Never forget who you are’ (तुम्ही कोण आहात हे कधीच विसरू नका) अशी पोस्ट त्याने लिहिली आहे. ‘द लायन किंग’ या चित्रपटातील हा डायलॉग आहे. अर्जुन आणि मलायका हे जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. या दोघांच्या त्यांच्या वयातील अंतरावरून अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मात्र टीकेला न जुमानता अर्जुन आणि मलायका एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत राहिले. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, डिनर डेटला हे दोघं हातात हात घालून एकमेकांसोबत दिसायचे.
अर्जुन कपूरची पोस्ट-
या ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुनने मलायकाच्या कठीण काळात तिची साथ दिली. मलायकाने काही दिवसांपूर्वी तिच्या वडिलांना गमावलं होतं. या दु:खाच्या काळात अर्जुन तिचं सांत्वन करण्यासाठी, तिच्या बाजूने खंबीरपणे उभं राहण्यासाठी पोहोचला होता. मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती.
आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचं मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मला घडवलं आहे. मी कोणत्याच पश्चात्तापाशिवाय जगते आणि ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते”, अशी प्रतिक्रिया तिने दिली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List