ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिल्या आहेत. अशीच एक बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जी तिच्या चित्रपट आणि अभिनयापेक्षाही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तिच्या बेधडक स्वभावामुळे, तिच्या अफेअर्समुळे चर्चेत राहिली आहेत. जी वयाच्या 39 व्या वर्षीही सिंगल आहे. ही अभिनेत्री म्हणजे कंगना राणौत.
शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात होती अभिनेत्री
कंगना ही नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती शाळेत असताना ती चक्क तिच्या एका शिक्षकाच्या प्रेमात होती. कंगनाने स्वत: हे सांगितले होते की ती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात होती. नववीत असताना तिला त्यांच्यावर प्रेम झालं होतं. पण तिचे हे प्रेम एकतर्फी होते. तिने हे कधीच त्या शिक्षकांसमोर व्यक्त केलं नव्हतं. हेही त्यावेळी तिला समजत होतं.
नववीत असताना झालं प्रेम
एका मुलाखतीत कंगनाने याबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की तिचे तिच्या शाळेतील शिक्षिकावर खूप प्रेम होतं. अनेकांना हे माहित असेल की एखाद्याचे पहिले प्रेम कदाचित शाळेतील शिक्षकावरच असते. जेव्हा तिला हा प्रश्न विचारण्यात आला की शाळेतील शिक्षकावर प्रेम का होतं ? तेव्हा कंगना म्हणाली होती, “जेव्हा तुम्ही लहान असता, वर्गात असता, तुमचे हृदय शिक्षकांसाठी धडधडते कारण ते सतत तुमच्या समोर असतात.” कंगनाला पुढे विचारण्यात आलं की त्यावेळी तिचे वय किती होते? यावर ती म्हणाली, “मी त्यावेळी नववीत होते. मी माझ्या शिक्षिकाच्या खूप प्रेमात होते.” पण अर्थातच तिने तिच्या लहानपणीचीही आठवण सांगितली.
कामाच्या बाबतीत…
2006 मध्ये आलेल्या ‘गँगस्टर’ चित्रपटातून पदार्पण करणारी कंगना आता अभिनेत्री असण्यासोबतच दिग्दर्शिकाही आहे. एवढंच नाही तर ती आता हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून भाजपचे लोकसभा खासदार देखील आहे. कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, कंगना शेवटची ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसली होती. यामध्ये तिने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List