सिंधू जल करार रद्द : पाकला झोंबलं म्हणून अशी आगलाऊ भाषा, लेफ्टनंट कर्नल डॉ.सतीश ढगे काय म्हणाले?
सिंधू जल करार रद्द करणे किती महत्त्वाचे होते हे पाकच्या नेत्यांच्या अनेक विधानांवरून समजतं. एका बाजूला पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो असे म्हणतात की एकतर सिंधू नदीतून पाणी वाहील किंवा भारतीयांचं रक्तवाहिल..तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ असं म्हणतात की सिंधू नदीचे पाणी आमच्यासाठी लाईफ लाईन आहे यावरुन सिंधु करार पाकच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे याची कल्पना येते असे यांनी म्हटले आहे.
म्हणजेच सिंधू नदी करार पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्याच पाण्याच्या आधारावर पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतामधील 80 टक्क्यांपेक्षा अधिक शेती. अर्थव्यवस्था अवलंबून आहे…म्हणून जर भारताने पाणी अडवलं तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था आधीच गर्तेत चालली आहे ती संपूर्ण दिवाळखोरीत निघेल अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ शकते. पाकिस्तानचे राज्यकर्ते हे सर्व ओळखून आहेत, त्यामुळेच पंतप्रधान असो किंवा परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो या प्रकारची विधानं करीत असल्याचे लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी म्हटले आहे.
भारतीय संसदेने 1994 साली एक प्रस्ताव पारित केला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अधिकृत भाग आहे आणि तो परत घेण्यासाठी भारताने प्रयत्न करावेत अशा प्रकारचा भारतीय संसदेचा ठराव आहे.पाक व्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी लोकांचे लॉन्चिंग पॅड आहेत. या लॉन्चिंग पॅडमुळेच गेल्या अनेक दशकांपासून अतिरेकी प्रशिक्षण घेऊन हल्ले करीत आहेत असेही सतीश ढगे यांनी म्हटले आहे.
दहशतवादी हल्ले जर थांबवायचे असतील तर पाक व्याप्त काश्मीरला भारतामध्ये सामील करून घेणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. दहशतवादाचा प्रश्न जर आपल्याला कायमचा संपवायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर भारतात समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये भारताकडून काही अत्याधुनिक मिसाईलची टेस्ट देखील करण्यात आली आहे असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या पश्चिमेला असलेल्या पाकिस्तान विरुद्ध लष्करी कारवाई करायची असेल त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या बाबीशी आपण तयारी केलेली आहे. इतकंच नाही तर स्क्रॅम जेट टेक्नॉलॉजी आपल्याला हायपरसॉनिक मिसाईलमध्ये वापरायचे असते, त्याची 1000 सेकंदाची टेस्ट आपण सक्सेसफुली पूर्ण केली आहे. म्हणजेच भविष्यामध्ये हायपरसॉनिक मिसाईल एकदम तयार परिस्थितीमध्ये आपल्याला मिळू शकेल आणि त्याचा वापर आपण पाकिस्तान विरुद्ध आणि जर गरज पडली तर चीनविरुद्ध सुद्धा करू शकतो म्हणून मागील काही दिवसांमध्ये झालेल्या या एक्झरसाईज भारतीय सैन्याचे सामर्थ्य वाढवू शकतात असेही सतीश ढगे यांनी म्हणाले.
42 लढाऊ विमानाची आपल्याला गरज
भारताकडे आधीच 36 राफेल विमान आहेत. ही अत्याधुनिक प्रकारची लढाऊ विमाने आहेत. चीन आणि पाकिस्तानचा मुकाबला करण्यासाठी ही लढाऊ विमान आपल्याला अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भारताचे सामर्थ्य जर आणखी वाढवायचा असेल आणि एक प्रकारे 42 लढाऊ विमानाची आपल्याला गरज आहे असेही सतीश ढगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन विरुद्ध आपल्याला लढायचं असेल तर फ्रान्सकडून अजून राफेल विमान घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
संपूर्ण रेकी अतिरेक्यांनी केली
हा दहशतवादी हल्ला पूर्वनियोजित असा हल्ला होता.यामध्ये मोठ्या प्रमाणात रेकी करण्यात आली आणि रेकी करून नेमके किती पर्यटक या ठिकाणी येतात आणि जातात. त्याचबरोबर या ठिकाणी किती सुरक्षा दलाचे जवान असतात कशाप्रकारे चेकिंग होते. तिथे जर पोहोचायचं असेल तर कसं जावं लागतं? आणि हा हल्ला केल्यानंतर या जंगलांमध्ये कसं पळून जाता येईल ही संपूर्ण रेकी अतिरेक्यांनी केली होती आणि या सगळ्यात तिथल्या काही स्थानिक लोकांचाही सहभाग होता. म्हणून एवढा मोठा हल्ला पहलगाममध्ये झाला असल्याचे सतीश ढगे यांनी म्हटले आहे. आत्ता या पाच दहशतवाद्यांची घरं सुरक्षा दलाच्या जवानांनी उध्वस्त केली आहेत. त्यापैकी एका अतिरिक्याचे दोन भाऊ हे ओव्हर ग्राऊंड वर्कर असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भारत सरकार त्यांची कसून चौकशी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List