Photo – मुंबई महापालिका एच पूर्व विभाग कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील विविध भागांत गेल्या दीड महिन्यांपासून होणाऱ्या अपुऱ्या आणि गढूळ पाणीपुरवठ्याविरोधात शिवसेनेचे आंदोलन सुरू आहे.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)
मुंबई महानगर पालिका एच पूर्व विभाव कार्यालयावर शिवसेना कलीना विधानसभा विभाग प्रमुख, आमदार ऍड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा, पाण्याच्या वेळेत होणारा सतत बदल, कमी वेळ होणारा पुरवठा या साऱ्याचा निषेध करण्यासाठी हातात हंडा आणि कळशी घेऊन माता-भगिणी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाल्या.
‘जो पर्यंत पाणी नाही, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही’, ‘जनता खड्ड्यात ठेकेदार जोमात’, मुंबईकरांना पाणी द्या नाहीतर खूर्च्या खाली करा’, अशा आशयाचे फलक घेऊन आणि सरकारविरोधात घोषणा देऊन महिलांनी परिसर दणाणून सोडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List