हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा तुरा, डॉ. मुमताज पटेल रॉयल कॉलेज ऑफ फिजिशयनच्या अध्यक्षपदी
हिंदुस्थानी वंशाच्या डॉ. मुमताज पटेल यांची युनाटेड किंग्डमच्या प्रतिष्ठित रॉयल कॉलेज ऑफ फिजिशयनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या आशियाई आणि मुस्लिम महिला आहे.
डॉ. पटेल यांचा जन्म इंग्लंडच्याच लंकाशायरमध्ये एका हिंदुस्थानी दाम्पत्याच्या पोटी झाला होता. सध्या त्या मँचेस्टरमध्ये किडनी विषेशज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या प्रसंगी डॉ. पटेल म्हणाल्या की या संस्थेला आणखी नावारुपाला आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या 20 वर्षांचा संपूर्ण अनुभव, समर्पण आणि मूल्यांवर आधारित नेतृत्वावर माझी भूमिका पार पडेन असेही पटेल म्हणाल्या.
डॉ. पटेल यांनी यापूर्वी RCP मध्ये सिनियर सेन्सर आणि उपसंचालक म्हणून काम केले आहे. 2024 पासून त्यांनी कार्यकारी संचालक म्हणून कारभार हाताळला होता. आता RCP च्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असून त्या विश्वस्त म्हणूनही काम करतील.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List