‘कंडोम विकते…’ नुसरत भरुचाने सांगितला तो किस्सा, अभिनेत्री म्हणाली खूपच वाईट…
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा सध्या तिच्या ‘छोरी 2’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेमध्ये आहे. नुसरतचा ‘छोरी 2’ चित्रपट अमेझॉन प्राईमवर 11 एप्रिल रोजी रिलीज झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला असून, चित्रपटाला चांगले रिव्हू मिळत आहेत. या चित्रपटामध्ये नुसरत भरुचा सोबत सोहा अली खान देखील लीड रोलमध्ये आहे. नुसरत आणि सोहा अली खानच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नुसरतने एक मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये बोलताना तिने ट्रोलर्संना चांगलंच सुनावलं आहे.
अभिनेत्री नुसरत भरुचा सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलताना म्हणाली की, लोक मुलींकडून एका विशिष्ट पद्धतीनं वागण्याची अपेक्षा करतात. मी सोशल मीडियावरील कमेंट जास्त वाचत नाही, पण एकवेळ अशी आली की, मला देखील लोकांच्या कमेंट्सना उत्तर द्यावं लागलं.
ऑनलाईन ट्रोलिंगबाबत बोलताना नुसरत म्हणाली की, लोकांना असं वाटतं की मुलींनी असंच वागवं जसं त्यांना वाटतं. मात्र जर मुलींनी काही वेगळा मार्ग निवडला तर लोकांना ते सहन होत नाही. लगेच ट्रोलिंग सुरू होतं. मी माझ्या पोस्टवर आलेल्या सगळ्याच कमेंट वाचत नाही, पण काही कमेंट्स वाचते. त्यानंतर नुसरतने ट्रोलिंग संदर्भात तिला आलेल्या अनुभवाचा एक किस्सा सांगितला.
नुसरतने तिच्या 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जनहित में जारी’ चित्रपटासंदर्भातील एक किस्सा सांगितला. त्यावेळी माझ्या चित्रपटासाठी एक कॅम्पेन सुरू होतं. त्या चित्रपटासाठी काही पोस्टर डिझाइन करण्यात आले होते. त्या पोस्टरला चित्रपटातील विषयानुसार सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. माझ्या टीमला हे माहीत होतं की हे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले तर आपण ट्रोल होऊ शकतो. मात्र तरी देखील ते पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले, त्यानंतर आलेल्या कमेंट्स वाचून मला धक्का बसला. डी ग्रेड अभिनेत्री, कंडोम विकते, अशा पद्धतीच्या त्या कमेंट्स होत्या.
त्यानंतर मी स्वत:ला थांबवू शकले नाही, मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा ऑन केला, एक व्हिडीओ बनवला आणि ट्रोलर्सला उत्तर दिलं. काही लोक चांगल्या कमेंट्स देखील करतात असंही तिने यावेळी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List