मुस्लीम असूनही सतत केदारनाथला का जाते? सारा अली खानचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत असते. सारा ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे. तिचे वडील मुस्लीम तर आई शीख आहे. आईवडील यांचं धर्म वेगवेगळं असलं तरी सारा तिच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार देवधर्माच्या गोष्टी पाळताना दिसते. कधी तिला केदारनाथ मंदिरात शंकराच्या दर्शनासाठी गेल्याचं पहायला मिळतं, तर कधी ती दर्ग्यातही प्रार्थना करायला जाते. साराला अनेकदा गुरुद्वारामध्येही पाहिलं गेलंय. यावरून अनेकदा तिला ट्रोलसुद्धा करण्यात आलंय. त्यावर आता तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे.
मुस्लीम असूनही हिंदूंच्या धार्मिक स्थळी जाऊन प्रार्थना केल्याने होणाऱ्या टीकेला ती कशी सामोरी जाते, असा सवाल साराला करण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “मला आधी याबद्दल काहीच समजायचं नाही. शाळेत किंवा आईवडिलांसोबत परदेशात एकत्र फिरायला जातानाही मला नेहमी प्रश्न पडायचा की अमृता सिंह, सैफ पतौडी, सारा सुलताना, इब्राहिम अली खान.. हे सर्व काय चाललंय? आम्ही नेमके कोण आहोत? मला आठवतंय की एकदा मी आईला प्रश्न विचारला होता की मी कोण आहे? तेव्हा तिने मला सांगितलं की तू भारतीय आहेस आणि हे मी कधीच विसरणार नाही.”
याविषयी ती पुढे म्हणाली, “आपलं राष्ट्र धरनिरपेक्ष आहे आणि मला वाटतं की या सर्व संकल्पना, सर्व काही सीमा या लोकांकडून बनवल्या आणि बिघडवल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी त्यांचं पालन करत नाही. मी अशा गोष्टींना महत्त्वच देत नाही. लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न करणं हा मूर्खपणा आहे. त्यापेक्षा मी त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करते.”
साराला अनेकदा केदारनाथ यात्रा करताना पाहिलं गेलंय. वर्षातून एकदा तरी ती केदारनाथ धाम दर्शनाला जाते. याविषयी तिने सांगितलं, “केदारनाथची माझी वैयक्तिक यात्रा, ज्यांना ते आवडतं किंवा ज्यांना ते आवडत नाही त्यांच्याबद्दल आदराने मी हे सांगते की ते तुमच्यापैकी कोणाबद्दल नाही. ते माझ्याबद्दल आहे. मला तिथे गेल्यावर मानसिक शांती मिळते. मला तिथे आनंदी वाटतं.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List