शाहरुखच्या मुलाला तुरुंगात कोण पुरवायचं सिगरेट, पाणी? गुंडांपासून आर्यनला होता धोका
Shah Rukh Khan Son Aryan Khan: 2021 हे वर्ष अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबियांसाठी फार कठीण होतं. 2021 मध्येच किंग खानचा मोठा मुलगा आर्यन खानला ड्रग्स केस प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईच्या सेंट्रल तुरुंगात आर्यन खान याला कैद करण्यात आलं होतं. जवळपास 25 दिवस आर्यनने तुरुंगवास भोगला आहे. या प्रकरणाला आज अनेक वर्ष झाली आहे. पण पुन्हा एकदा आर्यन खान प्रकरण चर्चेत आलं आहे. त्यामागे कारण देखील तसं आहे.
बिग बॉस फेम एजाज खान याने आर्यन खान संबंधी अनेक दावे केले आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत एजाज खान याने आर्यनबद्दल मोठा खुलासा केला. शिवाय तुरुंगात आर्यनला गुंडांपासून धोका होता.. असं देखील एजाज खान म्हणाला आहे.
आर्थर रोड तुरुंगात आर्यन खानला भेटल्यावर त्याने खूप मदत केल्याचा दावा एजाज खानने केला आहे. एजाज म्हणाला, ‘मी शाहरुख खानच्या मुलाला पाणी दिलं. त्याला सिगरेट दिली. मी त्याच्या मदतीसाठी धावलो. तुरुंगात असलेल्या एखाद्यासाठी तुम्ही हे करू शकता. आणि हो, मी त्याला गुंड आणि माफियांपासून वाचवलं. त्याला धोका होता, त्याला कॉमन बॅरेकमध्ये ठेवण्यात आलं होते. ‘ असं देखील एजाज म्हणाला.
ड्रग्स केसमध्ये स्वतः फसला एजाज
एजाज खानलाही पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. गेल्या वर्षीच एजाज खानची पत्नी फॅलन गुलीवाला हिलाही ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आल्याची माहिती समोर आली. एजाज खानने सलमान खानच्या वादग्रस्त शो बिग बॉस 7 मध्ये भाग घेतला होता. यादरम्यान एजाज अनेक स्पर्धकांसोबत एजाजचे वाद झाले. तेव्हा सलमान खान याने अनेकदा एजाजला फटकारलं होतं.
आर्यन खान याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं तर, सध्या सर्वत्र आर्यन खानची आगामी सीरिज The Ba**ds of Bollywood ची चर्चा रंगली आहे. या सीरिजच्या माध्यमातून आर्यन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आर्यन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List