‘मी स्वत:ला खोलीत बंद करुन…’ सुपरस्टार अभिनेत्याच्या पत्नीचा मोठा खुलासा
सुपरस्टार अभिनेता राम चरणची पत्नी उपासना कोनिडेला एक प्रसिद्ध उद्योजिका आहे आणि अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या उपाध्यक्षा आहेत. तिने अलीकडेच मानसिक आरोग्याबद्दल आणि नैराश्य, भावनिक खाणे इत्यादी गोष्टींचा सामना करण्याचा अनुभव सांगितला आहे. तिने सांगितले की तिच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्यावर नियंत्रण मिळवणे ही तिची सर्वात मोठी कामगिरी होती. कंटेंट क्रिएटर मासूम मीनावाला यांच्याशी झालेल्या संभाषणात, उपासनाने तिच्या कमकुवतपणाबद्दल आणि भूतकाळात तिने त्यावर कशी मात केली याबद्दल सांगितले.
उपासना म्हणाली, ‘मी स्वतःला खोलीत बंद करून घ्यायचे आणि मला सतत उदास वाटत असे. भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीत मी स्वतःला सर्वांपासून वेगळे करून घेतले होते. मी जेवणही सोडले होते.’ तिने कबूल केले की तणावपूर्ण काळात, अन्न हे नेहमी आरामदायक असते. उपासना म्हणाली की तेव्हापासून तिने जाणीवपूर्वक बदल केला आहे आणि निरोगी सवयी लावल्या आहेत. तणावाचा सामना करण्याचे चांगले मार्ग शोधले.
उपासनाने कशी परिस्थिती सांभाळली हे देखील सांगितले
उपासना म्हणाली, ‘आता मला माहित आहे की अशा परिस्थितींना कसे सामोरे जायचे.’ जर कोणी तणावात असेल तर मी त्यांना स्वतः उपाय शोधण्यास सांगते. मी त्यावेळी पूर्वीइतके जास्त जेवत नव्हते. आज, मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो की मी माझ्या शरीरावर नियंत्रण ठेवले आहे.’
उपासनाने पुढे या बदलाचे श्रेय मानसिकता आणि जीवनशैलीतील बदलाला दिले आहेत. तिने अनेक गोष्टी स्वीकारल्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये गोष्टी लिहून ठेवणे, संभाव्य उपायांचे विश्लेषण करणे आणि जेव्हा तिला बरे वाटेल तेव्हाच काम करणे याचा देखील समावेश आहे. उपासना म्हणाली, ‘मला वाटतं की या पद्धतींनी माझ्या आयुष्यात खूप मदत केली आहे.’ आपल्या आयुष्यात संतुलन आणण्याचे श्रेय योग्य दिनचर्येला दिले पाहिजेय. आता तिचे आयुष्य चांगले आहे आणि ती एक विलासी जीवनशैली जगते. एकट्या स्टार पत्नीची एकूण संपत्ती १,१३० कोटी रुपये आहे तर तिच्या पतीचे वेगळे उत्पन्न आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List