प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकरांविरोधात दिवाळखोरीची कारवाई, स्पष्टीकरण देत म्हणाले…
अक्षय बर्दापूरकर यांच्यावर थकबाकीचे आरोप करण्यात आले आहेत. 5.5 कोटींचा चित्रपट वित्तपुरवठा करातील प्लॅनेट मराठीकडे थकबाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. 'राव साहेब' सिनेमामुळे वाद सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.
बंगळुरीकील व्हर्स इनोव्हेशन्सच्या अर्जात थकबाकीचा उल्लेख करण्यात आला आहे. अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचं उल्लंघन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
थकबाकीचे आरोप झाल्यानंतर अक्षय बर्दापूरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'राव साहेब सिनेमा तयार आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर पैसे देणे इतकाच मुद्दा आहे. पैसे देणं मागे - पुढे झाल्यानं इन्सॉल्व्हेन्सी दाखल केली आहे.'
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List