Summer Dessert- उन्हाळ्याची दुपार कंटाळवाणी होणार नाही, घरच्या घरी बनवा टेस्टी डेजर्ट

Summer Dessert- उन्हाळ्याची दुपार कंटाळवाणी होणार नाही, घरच्या घरी बनवा टेस्टी डेजर्ट

उन्हाळ्याने आता कहर करायला सुरुवात केली आहे. यंदा एप्रिलच्या सुरुवातीलाच तीव्र उष्णता आहे. काही ठिकाणी पारा 40 अंशांच्या वर गेला आहे. उन्हाळ्यात आईस्क्रीमसोबत अनेक गोड पदार्थ खायला आवडतात. पण बाहेरचे अन्न खाल्ल्याने अनेकदा आरोग्यावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आम्ही तुमच्यासाठी गिल्ट फ्री रेसिपी घेऊन आलो आहोत, ज्या खाल्ल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि आजारी पडण्याचा धोका राहणार नाही. आणि या रेसिपी तुम्ही घरी सहज बनवू शकता.

मोहब्बत का शरबत


कृती –
एका मोठ्या भांड्यात दूध, साखर आणि रुहफजा घाला आणि चांगले मिक्स करा.

नंतर त्यामध्ये ताज्या कलिंगडाचा रस घाला. चांगले मिक्स करुन कलिंगडाचे तुकडे देखील दुधाच्या मिश्रणात घाला.

सर्व साहित्य चांगले मिक्स करा. गरज पडल्यास, बर्फाचे तुकडे देखील घाला.

सरबत सर्व्हिंग ग्लासमध्ये भरा. सरबत कलिंगडाच्या काही तुकड्यांनी सजवा.

मोहब्बत का शरबत तयार आहे. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवून कोल्ड मोहब्बत का शरबत सर्व्ह करा.

 

 

विथआउट शुगर मॅंगो आइसक्रीम

कृती –
आंबा स्वच्छ करून सोलून घ्या. लगदा कापून बिया काढून टाका. आंब्याचा लगदा ब्लेंडरच्या भांड्यात घाला आणि आंब्याची प्युरी बनवा.

आंब्याची प्युरी एका भांड्यात काढा. त्यात फ्रेश क्रीम घाला आणि सर्वकाही चांगले मिक्स करा.

मिश्रणात केशर आणि अर्धा पिस्ता घाला. आणि परत चांगले मिक्स करा. चवीसाठी थोडे मध घाला.

सर्वकाही चांगले मिक्स झाल्यावर फ्रीजर-प्रूफ कंटेनरमध्ये सर्व मिश्रण ठेवा.

कंटेनर फ्रीजरमध्ये 5-6 तास किंवा रात्रभर ठेवा जोपर्यंत आइस्क्रीम घट्ट गोठत नाही.

आईस्क्रीम तयार झाल्यावर ते बाहेर काढा आणि त्यावर ताज्या आंब्याचे तुकडे, मध आणि पिस्ते घालून सर्व्ह करा.

 

 

 

मॅंगो  फालूदा

कृती –

सर्वप्रथम जाड शेवया पाण्यात शिजवून घ्यायच्या आहे.

एका बाउलमध्ये पाणी, साखर, बर्फ घालायचे. साखर विरघळे पर्यंत चमच्याने  ढवळून घ्या.

त्यानंतर शिजवलेल्या शेवया पाणी, साखर, बर्फ असलेल्या पाण्यात घालायच्या आहे. या प्रकरियेमुळे शेवयांना साखरेमुळे चांगला फ्लेवर येतो. आणि शेवया सुटसुटीत होतात.

एका फालूदा ग्लासमध्ये सर्वप्रथम बर्फ घाला. त्यांनंतर रोज सिरप घाला. नंतर सब्जा घालायचा आहे. त्यानंतर तयार केलेल्या शेवया टाकायच्या आहे. मग त्यामध्ये मॅंगो रस घाला. नंतर व्हॅनिला आइस्क्रीम घाला. त्यानंतर आंब्याचे काप घाला. आणि सर्वात शेवटी बारीक केलेल्या ड्रायफ्रुटने फालुदा सजवून घ्या. आणि सर्व्ह करा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Puratawn चित्रपटाची देशभरात चर्चा, सर्वांनी चित्रपट पाहाण्याचे इंद्रनील सेनगुप्ता यांचं आवाहन! Puratawn चित्रपटाची देशभरात चर्चा, सर्वांनी चित्रपट पाहाण्याचे इंद्रनील सेनगुप्ता यांचं आवाहन!
Puratawn Film Release : सध्या Puratawn या बंगाली सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. या चित्रपटात कधीकाळी बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला...
शर्मिला टागोर यांच्या ‘पुरातन’ चित्रपटाचा प्रीमीयर, बंगाली म्हणून अभिमानाचा क्षण,अभिनेत्री पूजा बॅनर्जी यांची प्रतिक्रीया
‘मी आज खूप आनंदी, हा चित्रपट माझ्यासाठी खूप स्पेशल’; Puratawn बद्दल काय म्हणाल्या रितुपर्णा सेनगुप्ता?
सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला