एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम पुढे ढकला, आदित्य ठाकरे यांचं MMRDA ला पत्र
एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम काही काळासाठी पुढे ढकलले जावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA ) आयुक्त संजय मुखर्जी यांना पत्राद्वारे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी X वर एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.
एमएमआरडीए लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू केलेला वरळी-शिवडी कनेक्टर हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू आहे. या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग असलेला एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम फेब्रुवारी महिन्यात करण्याचे निश्चित केले गेले होते. मात्र विद्यार्थ्यांच्या परिक्षेच्या काळात होणाऱ्या अडचणीचा विचार करत पुलाचे पाडकाम परीक्षा संपल्यानंतर करण्याची मागणी मी आपणाकडे केली होती, त्याची आपण दखल घेत, सदर पाडकाम थांबवून, परीक्षा संपल्यानंतरचा कालावधी निक्षित करण्यात आला, त्याचद्दल आपले आभार.”
त्यांनी पत्रात पुढे लिहिलं की, “सध्या गणपराव कदम मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे आणि त्याचे काम पूर्व झाल्यावरच एल्फिनटन पुलाचे पाडकाम सुरु करणे योग्य ठरेल. जेणेकरून ट्रफिक समस्यांमुळे नागरिकांची अडचण होणार नाही. तरी एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम काही काळासाठी पुढे ढकलले जावे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एल्फिन्स्टन पूल पाडण्याच्या तारखेबद्दल, तिथल्या नागरिकांच्या समस्येबद्दल आणि होणाऱ्या वाहतुक कोंडीबाबत उपाययोजना सुचवणारे व महत्वाच्या बाबींकडे लक्ष वेधणारे पत्र MMRDA अध्यक्षांना लिहिले.
ते ह्या पत्राची दखल घेऊन योग्य निर्णय घेतील आणि परिसरातील नागरिकांना कमीत कमी त्रास होईल… pic.twitter.com/1qwNQU69l2
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 11, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List