हिंदू देवी-देवतांचा अपमान, नको ते शब्द वापरल्यामुळे प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात FIR दाखल
Ram Gopal Varma controversy 2025: बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय निर्माता राम गोपाल वर्मा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकल आहे. यावेळी दिग्दर्शकावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदू देवी-देवता आणि धार्मिक ग्रंथांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. त्याच्याविरुद्ध आंध्र प्रदेशातील थ्री टाउन पोलिस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त राम गोपाल वर्मा याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
राष्ट्रीय प्रजा काँग्रेसचे अध्यक्ष (Rashtriya Praja Congress) आणि उच्च न्यायालयाचे वकील मेदा श्रीनिवास (Meda Srinivas) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मेदा श्रीनिवास यांनी राम गोपाल वर्माच्या फेसबुक आणि यूट्यूब अकाउंटवरून घेतलेले व्हिडिओ क्लिप आणि स्क्रीनशॉट पोलिसांना दिले आहेत, ज्यात हिंदू देवी-देवतांची आणि धार्मिक ग्रंथांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे.
माध्यमांशी बोलताना श्रीनिवास म्हणाल्या, ‘राम गोपाल वर्मा याचं विधान फक्त अपमानास्पद नाही तर रामायण आणि महाभारतासारख्या पवित्र ग्रंथांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न आहे. मेगा यांनी आरोप केला की या मजकुरामुळे सामाजिक सौहार्द आणि धार्मिक शांतता बिघडू शकते.’
एवढंच नाही तर मेदा यांनी तक्रार दाखल करत पोलिसांकडे मागणी देखील केली आहे. राम गोपाल वर्मा यांच्या चाहत्यांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांच्या विधानांचा समाजावर खोलवर परिणाम होवू शकतो. म्हणून याप्रकरणी गंभीर चौकशी व्हावी अशी मागणी मेदा श्रीनिवास यांच्याकडून करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर याप्रकरणी सध्या वाद सुरु आहेत. पण यावर अद्याप राम गोपाल वर्मा आणि त्यांच्या टीमने अधिकृत स्पष्टीकरण दिलेलं नाही. ही पहिली वेळ नाही, ज्यामुळे राम गोपाल वर्मा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याआधी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राम गोपाल वर्मा यांनी ‘सत्या’ (Satya), ‘सरकार’ (Sarkar), ‘रंगीला’ (Rangeela) असे अनेक हीट सिनेमे बॉलिवूडमध्ये दिले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी हिंदीच नव्हे तर, दक्षिण भारतीय सिनेमांचेही दिग्दर्शन केले आहे. टॉलीवूड आणि बॉलिवूड या दोन्ही ठिकाणी त्यांनी नाव कमावले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List